डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाने बुधवारी मुंबई विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आफ्रिकन व्यक्तीसह एकूण तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी सुमारे २० कोटी किमतीचे १९७० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ३५ वर्षीय आरोपी आदिस अबाबाहून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली होती. त्याने आपल्या प्रवासी बॅगेत १९७० ग्रॅम कोकेन लपवलं होतं. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना आरोपीवर संशय आल्यानंतर सापळा रचून अटक केली आहे.

संबंधित आरोपी मुंबई विमानतळावर आपल्या साथीदारांना हे कोकेन देणार होता. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यामध्ये एका आफ्रिकन व्यक्तीचा समावेश आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International cocaine smuggling gang busted in mumbai drugs worth 20 crore seized at airport rmm
Show comments