भारताची ‘वाइन कॅपिटल’ म्हणून प्रसिद्धीस आलेल्या नाशिक शहरात अखिल भारतीय द्राक्ष प्रक्रिया मंडळ आणि अखिल भारतीय वाइन उत्पादक संघटना यांच्या वतीने २ व ३ मार्च रोजी ‘इंडिया हार्वेस्ट २०१३’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाइन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन हॉटेल ज्युपिटर येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी खा. समीर भुजबळ, अन्न व प्रक्रिया विभागाचे संयुक्त सचिव यू. व्यंकटेस्वरलू, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकासचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील, महापौर अॅड. यतीन वाघ आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय द्राक्ष प्रक्रिया मंडळाचे अध्यक्ष जगदीश होळकर आणि अखिल भारतीय वाइन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी आहेर यांनी दिली. या आंतरराष्ट्रीय वाइन महोत्सवामुळे नाशिक जिल्ह्यात तयार होणाऱ्या वाइन्स आणि येथील द्राक्षांचे महत्त्व जगभर नव्याने अधोरेखित होणार आहे. जिल्ह्यात नव्यानेच उभ्या राहत असलेल्या वाइन उद्योगात विदेशी गुंतवणूकही होऊन उद्योगाला संजीवनी मिळू शकेल. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जिल्ह्यातील वाइन उद्योगात गुंतवणूक केली असून आणखीही काही नवी गुंतवणूक प्रस्तावित आहे. या सर्वच दृष्टींतून तसेच नाशिक शहराचा स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण व्हावा, शहर सर्वागीण विकसित व्हावे म्हणून या वाइन महोत्सवाचे विशेष महत्त्व आहे. ‘इंडिया हार्वेस्ट २०१३’ हा मनोरंजनप्रधान महोत्सव असून वाइन्सचा आस्वाद मेजवानी ठरणार आहे. याबरोबरच विविध जातींच्या द्राक्षांची दालने, वाइन्सचे स्टॉल आणि संलग्न बाबी नाशिककर तसेच देशी-विदेशी पाहुण्यांचे खास आकर्षण असणार आहे. या महोत्सवामुळे, वाइनबाबतचे गैरसमज दूर होऊन कुंभमेळ्याच्या पाठोपाठ, नाशिक वाइन आणि द्राक्षांमुळेही आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शहर होण्यास मदत मिळणार आहे. वाइन व द्राक्षे जिल्ह्याच्या विकासास कारणीभूत होऊ शकतात. आर्थिक विकासाची ताकद या क्षेत्रात असल्याचे होळकर व आहेर यांनी नमूद केले. सचिव राजेश जाधव हेही याप्रसंगी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Mar 2013 रोजी प्रकाशित
नाशिकमध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय ‘वाइन महोत्सव’
भारताची ‘वाइन कॅपिटल’ म्हणून प्रसिद्धीस आलेल्या नाशिक शहरात अखिल भारतीय द्राक्ष प्रक्रिया मंडळ आणि अखिल भारतीय वाइन उत्पादक संघटना यांच्या वतीने २ व ३ मार्च रोजी ‘इंडिया हार्वेस्ट २०१३’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाइन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 02-03-2013 at 04:13 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International wine festival in nashik begain today