वाई: सातारा जिल्ह्यात इंटरनेट सेवा ७२ तासांनी प्रशासनाकडून पूर्ववत करण्यात आली आहे.मात्र जमाव बंदी आदेश अद्याप हटवण्यात आलेला नाही.पुसेसावळी येथे झालेल्या दंगली नंतर नव्याने तणाव निर्माण होवू नयेत यासाठी प्रशासनाकडून मागील तीन दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद होती.सलग तीन दिवस इंटरनेट सेवा बंद राहिल्याने व्यापार उद्योग आणि बँकिंग व्यवहार ठप्प राहिले होते.नेट बंद राहिल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना आले यश आले.
बुधवारी रात्री १२ पासून इंटरनेट सेवा पुन्हा सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.पोलीस प्रशासन आणि सायबर सेलची समाज मध्यमावर करडी नजर राहणार आहे.अफवा पसरवल्यास होणार आता तुरुंगवास होणार आहे. इंटरनेटच्या माध्यमातून अफवा पसरून जिल्ह्यातील शांतता बिघडू नये आणि वातावरण गढूळ होऊ नये या हेतूने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी, नोकरदार वर्ग, सामान्य जनता यांचे हाल झालेेले पाहायला मिळाले.अखेर आज इंटरनेट सेवा सुरू झाल्याने सातारकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.इंटरनेटमुळे व्यवहार पूर्ववत होण्यास मदत होणार आहे.
पुसेसावळी दंगलीचा सर्वात मोठा परिणाम सर्व व्यवहारांवर झाला.लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले.पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोलमडला.नेट बंद झाल्याने पाचगणी महाबळेश्वर येथून अनेक पर्यटक परत फिरले.साताऱ्यात खूप मोठी दंगल झाल्याचा संदेश सर्वत्र पसरल्याने मोठे नुकसान सर्व क्षेत्रास सोसावे लागले अनेकांनी सताऱ्याकडे आणि पर्यटनाकडे पाठ फिरवली..इंटरनेट सेवा पूर्ववत केली असली तरी या सेवेवर आणि समाज माध्यमावर पोलीसांचे बारीक लक्ष असणार आहे.फेसबुक, व्हाट्सअप चा वापर आवश्यक तेवढ्याच करा, सामाजिक शांतता व सलोखा भंग करणारी कोणतीही माहिती शहानिशा व खात्री केल्याशिवाय पुढे (फॉरवर्ड) कोणालाही पाठवू नका. आक्षेपार्ह मजकूर फोटोमाहिती घटना खात्री न करता पुढे पाठवणे हा गुन्हा ठरू शकतो. सातारा जिल्ह्यातील वातावरण दूषित होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. इंटरनेट सेवा प्रशासनाकडून पूर्ववत करण्यात आली असली तरी जमाव बंदी आदेश अद्याप हटवण्यात आलेला नाही.