सांगली : जतमध्ये घडलेले २६ लाखांचे सोने फसवणुक प्रकरणाचा तपास संशयास्पद असून निष्पक्ष तपास होण्यासाठी सक्षम अधिकार्याकडे हे प्रकरण सोपविण्यात यावे अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी रविवारी पत्रकार बैठकीत केली. या प्रकरणामध्ये काही पोलीस कर्मचारी व राजकीय व्यक्तीचा सहभाग असल्याचा आरोपही त्यांनी केला..
गणेश वसमल (रा. कर्नुल आंध्र प्रदेश) या सोनाराला कमी किमतीत अर्धा किलो सोने देतो असे सांगून जतमध्ये बोलावून घेण्यात आले. पैसे दाखविल्यानंतर सोने देतो असे सांगून अगोदर 26 लाख 50 हजार रूपये घेण्यात आले. पैसे दिल्यानंतर सोन्याचे बिस्किट वितळवून देतो असे सांगून वेळ काढण्यात आला. तर याच दरम्यान चर्चेत गुंतवून पैशाची बॅग घेउन एकजण पळून गेला. या प्रकरणी अनिल सुतार, दर्याप्पा हळीनाळ मिस्त्री, मेहबूब जातगार, रमेश कोळी आणि अमोल कुलकर्णी या पाच जणांविरूध्द जत पोलीस ठाण्यात वसमल यांनी तक्रार दाखल केली आहे. पैसे लुटीचा प्रकार असताना येवळ फसवणुकीचाच गुन्हा दाखल करून घडलेला प्रकार सौम्य करण्याचा का प्रयत्न झाला असे सवाल उपस्थित केला जात आहेत.
आणखी वाचा-अस्तित्वाचे प्रश्न दुर्लक्षून अस्मितेचे प्रश्न आणणे लोकशाहीचा खेळखंडोबा, मेधा पाटकरांचे मत
जत औद्योगिक वसाहतीमधील एका शीतगृहामध्ये हा प्रकार घडत असताना त्या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. तर प्रकरण परस्पर मिटावे यासाठी काही माजी नगरसेवक प्रयत्नशील आणि एका राजकीय नेत्याचा हस्तक पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते असा आरोप करून श्री. जगताप यांनी या प्रकरणाचा तपास एखाद्या सक्षम अधिकार्यामार्फत अथवा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्याची मागणी केली.