Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. हायकोर्टाने रश्मी शुक्लांविरोधात नोंदवलेले दोन FIR रद्द केले आहेत. एक FIR पुण्यात तर दुसरा मुंबईत नोंदवण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभगाच्या प्रमुख या नात्याने विरोधी पक्षातल्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचं हे प्रकरण आहे. फडणवीस सरकारनंतर जेव्हा राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर रश्मी शुक्लांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. नाना पटोले, संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन केल्याप्रकरणी हे दोन FIR करण्यात आले होते. ते रद्द करण्यात आले आहेत.

फोन टॅपिंगचे प्रकरण काय?

महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांचा आरोप रश्मी शुक्लांवर करण्यात आलेला होता. या प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप रश्मी शुक्लांवर ठेवण्यात आला. रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून गुप्तवार्ता विभागाने नेत्यांचे फोन टॅप केले. त्या नेत्यांचे फोन बनावट नावांनी टॅप करण्यात आल्याचा आरोप आहे.

How to block your phone from tracking your location
तुमचं लोकेशन आता कोणीही ट्रॅक करणार नाही? ‘असा’ ब्लॉक करा तुमचा फोन
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
पोटगीची रक्कम थकविल्याने पतीची कारागृहात रवानगी
accused molested four year old girl sentenced to twenty years of hard labor and fine
कारागृहातून सुटल्यानंतर गोंधळ; साताऱ्यात नऊ जणांवर गुन्हा
Relief for teacher recruitment candidates Proposal submitted for TET exam
शिक्षक भरती उमेदवारांना दिलासा… ‘टेट’ परीक्षेसाठी प्रस्ताव सादर…
case filed against man who help to escape accused in kalyan district court
कल्याण जिल्हा न्यायालयात आरोपीला पळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इसमावर गुन्हा
pil filed in High Court demanding ED inquiry into Valmik Karad accused in Santosh Deshmukhs murder
वाल्मिक कराडच्या आर्थिक व्यवहारांच्या ईडी चौकशीचे आदेश द्या, जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात मागणी
Motor Accident Claims Tribunal , vacancies ,
मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातील रिक्त पदे कधी भरणार ? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

नाना पटोले यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे त्यांचा फोन टॅप करण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री रावसाहेब दानवेंचे स्वीय सहाय्यक आणि तत्कालीन भाजपचे खासदार संजय काकडे, इतर लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करण्यात आले होते.

Story img Loader