राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष २ जुलै २०२३ या दिवसापासून चांगलाच चर्चेत आहे. कारण अजित पवार यांनी सत्तेमध्ये जात शरद पवारांनाच आव्हान दिलं आहे. अशात आता शरद पवार हे बीडमध्ये सभा घेत आहेत. ते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशात दोन्ही नेते गेल्या काही दिवसांमध्ये एकमेकांच्या विरोधात काही बोललेले नाहीत. तसंच पक्ष फुटलाय, दोन गट पडले आहेत असं कुणीही काही बोलत नाही. तसंच या दोघांची एक भेटही चांगलीच चर्चेत आहे. अशात अजित पवार हे माईंड गेम खेळत आहेत का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारला गेला. त्यावर सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“मला वाटतं की प्रेम असणं काही गैर नाही. आमची लढाई ही काही वैयक्तिक नाही. आमची काही दुश्मनी नाही. आमची लढाई विचारांची आहे. एन. डी. पाटील यांच्या पत्नी म्हणजे शरद पवारांची सख्खी बहीण. तेव्हा कधीही कुणीही म्हणालं नाही की एन. डी. पाटील एक बोलतात आणि शरद पवार एक बोलतात. आमच्याकडे आमच्या आत्या आणि त्यांचे मिस्टर म्हणजे एन.डी. मामा अनेकदा यायचे. गाठीभेटी व्हायच्या, आम्ही त्यांच्या घरी जायचो, ते आमच्या घरी यायचे. पण म्हणून आमचे राजकीय मतभेद कधीच कमी झाले नाहीत.” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

हे पण वाच- “शरद पवारच भाजपाचा गेम करतील”, बच्चू कडूंचं सूचक विधान, मंत्रीपदावरही केलं भाष्य!

अजित पवार उत्तर सभा घेणार आहेत तर तो प्रश्न त्यांना विचारलं पाहिजे. त्यावर मी कसं काय उत्तर देणार? असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. राजकीय मतभेद आणि कौटुंबिक संबंध या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. बरं चोरडियांच्या घरी जी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. त्यात काही विशेष गोष्ट घडलेली नाही. चोरडिया हे माझ्या आणि अजित पवारांच्या जन्माच्या आधीपासून शरद पवार यांचे मित्र आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is ajit pawar playing mind games what supriya sule said scj