शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते मोहित कंबोज यांच्याबाबत मोठा दावा केला होता. मोहित कंबोज हे शनिवारी रात्री साडेतीन वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत होते, असा दावा राऊत यांनी केला. याप्रकरणी गृहमंत्री आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबतचा एक व्हिडीओही संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून शेअर केला होता.

संजय राऊत यांच्या दाव्यानंतर मोहित कंबोज यांची पत्नी अक्षा कंबोज यांनी मोठा खुलासा केला आहे. शनिवारी रात्री बारमध्ये मोहित कंबोज यांच्याबरोबर केवळ मीच होते. त्यामुळे यावर कोण काय म्हणत आहे, याने काहीही फरक पडत नाही, असं ट्वीट अक्षा कंबोज यांनी केलं आहे.

myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

हेही वाचा- Video : “भाजपा नेते मोहित कंबोज बेधुंद अवस्थेत मुलींबरोबर…”, संजय राऊतांनी केली चौकशीची मागणी, नेमकं प्रकरण काय?

अक्षा कंबोज यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, “शनिवारी रात्री मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आम्ही रेडिओ बारमध्ये गेलो होतो. या बारमध्ये मोहित कंबोज यांच्याबरोबर मी एकमेव मुलगी होते. त्यामुळे यावर कोण काय म्हणत आहे, याने काहीही फरक पडत नाही. बनावट कथा फार काळ टिकणार नाहीत.”

नेमकं प्रकरण काय आहे?

संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला होता. “लिंक रोड खार पश्चिम येथील रेडिओ बारमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे खास मोहित कंबोज मुलींना घेऊन नाचत आहेत, धिंगाणा घालत आहेत. रात्री साडेतीन वाजता हा व्हिडीओ शूट केला आहे. येथे कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? मोहित कंबोज बेधुंद अवस्थेत, नशा करून मुलींबरोबर नाचत आहेत,” असा दावा सचिन कांबळे यांनी व्हिडीओद्वारे केला होता.

सचिन कांबळे यांचा हाच व्हिडीओ संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे शेअर केला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुंबई पोलीस आयुक्त आणि नार्कोटिक्स ब्युरोला टॅग करत त्यांनी, “महाशय आपण काय कारवाई केली ते जनतेला कळू द्या. येथे अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री होत असल्याची माहिती आहे. भाजपाचे हिंदुत्व येथे काय करीत होते? सीसीटीव्ही फुटेज लगेच ताब्यात घ्या. खोक्यांचे राज्य हे अंमली पदार्थांचे राज्य होऊ नये”, असं ट्वीट राऊतांनी केलं होतं.

Story img Loader