राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पवारांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचेही आयोजन केले होते. याशिवाय अनेकांकडून शरद पवारांना सोशल मीडियाद्वारे आणि अन्य माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान, राज्यातील सत्ताधारी भाजपानेही पवारांना शुभेच्छा दिल्या आहे. मात्र याचवेळी काही प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणाही साधला आहे.

“राज्य सरकारच्या विरोधात कुठल्याच मुद्य्यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी कुठली भूमिका मांडता येत नाही, त्यामुळे शाईफेक करणं हे शरद पवारांचं धोरण आहे का? असा प्रश्न भाजपाचा आहे. महिला धोरण त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच आणलं होतं, तसंच शाईफेक धोरण आणलं जातय का? हादेखील आमचा प्रश्न आहे.” असं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले आहेत.

Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
Sharad Pawar on Supriya Sule Sadanand Sule
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
भाजपाच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवरून शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, “सत्ताधाऱ्यांची मानसिकता…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकारपरिषदेत बोलताना म्हटले की, “शरद पवारांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने आपलं धोरण बदललं आहे का? असा प्रश्न आज पडतोय. शरद पवारांचं धोरण या वाढदिवसानिमित्त अधिकृत करण्याचं काम राष्ट्रवादी करणार आहे का? मागील काही दिवसांमध्ये आपण पाहतो आहोत, विशेषता शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून, महाराष्ट्रात विकासकामांचे खूप निर्णय घेतले गेले. राज्यातील जनता डोळ्यासमोर ठेवून हे सर्व निर्णय घेतले गेले. महाराष्ट्रात विरोध करायला मुद्दे सापडत नाहीत, ही विरोधकांची अवस्था आहे. त्यामुळे परवा भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक कऱण्यात आली.”

हेही वाचा – Sharad Pawar Birthday : “आजच्या दिवशी मी कोणाची बिनपाण्याची करण्याचं ठरवलं नव्हतं, पण …” – अजित पवार स्पष्टच बोलले!

याशिवाय, “यापूर्वी ज्यावेळी शरद पवारांवरत अशा गोष्टी घडल्या होत्या, तेव्हा भाजपाने किंतू परंतु न करता अशा घटनांचा तीव्र निषेध केला होता. एखादी गोष्ट पटत नसेल तर तिला वैचारिक पद्धतीनेच उत्तर दिलं गेलं पाहिजे, ही भूमिका असली पाहिजे. असंही उपाध्ये म्हणाले.”

याचबरोबर, “महाराष्ट्रातील राजकारणाला खालच्या पातळीवर नेण्याचं काम मोठ्याप्रमाणावर राष्ट्रवादीने यापूर्वीही केलं. आता शाईफेक जी झालं त्याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन ज्या पद्धतीने राष्ट्रवादीकडून सुरू आहे. त्यावरून शाईफेक हेच शरद पवारांचं धोरण अशी नवीन भूमिका आज त्यांच्या वाढदिवासानिमित्त घेतली आहे का? याचा खुलासा जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी करायला हवा.” असं शेवटी उपाध्ये म्हणाले आहेत.