Devendra Fadnavis on Bulldozer action: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर या कारवाईवर अनेक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत. मात्र सरकारकडून या कारवाईचे वारंवार समर्थन करण्यात आलेले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या दोन-तीन दिवसांपासून वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत आहेत. या मुलाखतींमध्ये ते वारंवार पोलिसांच्या करवाईचे समर्थन करताना दिसून आले. तसेच काही दिवसांपूर्वी धारावीतील अवैध धार्मिक स्थळावरील बुलडोझर कारवाई चर्चेचा विषय ठरली होती. महाराष्ट्रही आता उत्तर प्रदेशप्रमाणे बुलडोझर कारवाई आणि चकमकीच्या माध्यमातून आरोपींना ठोकण्याची प्रेरणा घेत आहे का का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना झी न्यूजच्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला.

देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिले?

गृहमंत्री म्हणाले की, अक्षय शिंदेच्या प्रकरणात पोलिसांची कारवाई योग्यच होती. त्याने आधी पोलिसांवर गोळी झाडली. अशावेळी पोलीस त्याच्यासमोर हात जोडून त्याला शांततेचे आवाहन करू शकत नाही. त्याने गोळी चालवली म्हणून पोलिसांनाही स्वसंरक्षणार्थ गोळ्या झाडाव्या लागल्या. पोलिसांनी काहीही चुकीचे केले नाही. या घटनेला फेक एन्काऊंटर म्हणणे चुकीचे आहे.

हे वाचा >> Akshay Shinde Burial: अक्षय शिंदेच्या दफनविधीबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निकाल; वकिलांनी दिला छत्रपती शिवरायांचा दाखला, म्हणाले, “अफजलखानाचाही…”

न्यायालयाच्या म्हणण्याला काही अर्थ नाही

सदर एन्काऊंटरच्या विरोधात अक्षय शिंदेच्या पालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर बोलताना ते म्हणाले, उच्च न्यायालयासमोर परिस्थिती अजून आलेली नाही. न्यायालयाने काही टिप्पण्या केल्या आहेत. न्यायालयात जे सांगितले जाते, ते महत्त्वपूर्ण नसते. न्यायालयात काय लिहिले जाते, त्याला महत्त्व असते. न्यायालयाने आपल्या लेखी आदेशात याबद्दल कोणतीही टिप्पणी केलेली नाही. त्यामुळे एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही, असेही फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा >> Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण? चकमकफेम प्रदीप शर्मांबरोबर केलं होतं काम

बुलडोझर कारवाई आणि एन्काऊंटरची प्रेरणा उत्तर प्रदेशकडून घेतली का?

बुलडोझर कारवाई आणि एन्काऊंटर ही प्रेरणा उत्तर प्रदेश सरकारकडून घेतली का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, उत्तर प्रदेशकडून प्रेरणा घेण्यासाठी इतर अनेक गोष्टी आहेत. त्यांनी राम मंदिर बांधले, याची प्रेरणा घेऊ. पण एन्काऊंटरची प्रेरणा घ्यायची आम्हाला गरज नाही. एकेकाळी फक्त महाराष्ट्रात विकास करण्यात आघाडीवर होता. आज उत्तर प्रदेशही विकास करत आहे, याचा आनंद होतो. पण महाराष्ट्र हे सर्वांच्या पुढे गेलेले राज्य आहे. महाराष्ट्राला इतर राज्यांकडून प्रेरणा घेण्याची गरज नाही.