वाई: कोरेगाव तालुक्यात अनेक गावात केले म्हणून सांगितलेले रस्ते, पाणी, साधी गटारांची कामे आता सापडत नाहीत. तर ती दिसत नाहीत मग चोरीला गेली का? कामांचा केवळ देखावा करत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आमदारांनी कोरेगाव मतदारसंघासाठी काय केले याचा आम्ही शोध घेत असल्याचे टीका आमदार महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा नामोल्लेख टाळून केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कठापूर (ता. कोरेगाव) येथे सुमारे १८ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभात आमदार महेश शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल बर्गे, भारतीय जनता पक्षाचे कोरेगाव तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शिवसनेचे कोरेगाव तालुकाप्रमुख संजय काटकर, कोरेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य नवनाथ केंजळे, प्रल्हाद केंजळे, इसाक सुतार, अधिक केंजळे, दीपक केंजळे, श्रीरंग सापते आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-“निवडणुकांपूर्वी तुरुंगातल्या कैद्यांना बाहेर काढून…”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, “मुख्यमंत्री कार्यालयातून…”

महेश शिंदे म्हणाले,आजही रस्ते, पाणी, साधी गटार सारख्या मूलभूत सुविधा नाही नाहीत. एका गावात मध्यंतरी १४० रुग्ण डेंगीचे आढळले. उपचारासाठी एकाला किमान ४० हजार खर्च धरला तर किती झाले बघा. मग मला प्रश्न पडतो की दमदार आमदार म्हणवून घेणाऱ्यांनी नेमके केले काय?, असा प्रश्न उपस्थित करुन काही कामे तर केवळ कागदावर झाली आहेत.अनेक गावाचे रस्ते सापडत नाहीत.तब्बल सहा गावांत तर आम्ही सभामंडप शोधतोय.मात्र, ते सापडत नाहीत. आता चोरी झाली म्हणून पोलिसात तक्रार करायची उरली आहे. अशी ती काही आमदार महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा नामोल्लेख टाळून केली.