शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. आयोगाचा हा निर्णय शिवसेनेसाठी धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे. तसेच न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. कालपासून विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी देखील आज औरंगाबादेत प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्वीटद्वारे भाजपावर थेट आरोप केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“शिंदेंचा खांदा वापरून भाजपाने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा फडशा पाडण्याचे काम चालवले आहे. आता धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेले आहे. भाजपाचे काम फत्ते झाले आहे. आता हस्तक शिंदेंचा भाजपाला काय उपयोग? एकनाथ शिंदे यांच्याराजकीय अस्ताची ही सुरूवात आहे?” असं वरपे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

शरद पवार काय म्हणाले? –

“निर्णय हे गुणवत्तेवरून घेतल्या जातील याची खात्री हल्ली देता येत नाही. त्यामुळे असं काहीतरी घडेल हे गेले काही दिवस वाचत होतो, ते घडलं. पण असं घडेल असं माझं मन मला सांगत होतं. आता इथून पुढे निवडणुकांना जर सामोरं जायचं असेल आणि शक्तीशाली एखादी संघटना असेल, तर ती जे चिन्ह ठरवेल ते शेवटपर्यंत टिकेलच असं सांगता येणार नाही. त्यामुळे चिन्ह असो अथवा नसो, निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी ठेवली पाहिजे.”

नक्की वाचा : निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात काल (शनिवार) चार तास झालेल्या बैठकीनंतर, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे. आता दोन्ही गटांना स्वत:च्या पक्षासाठी नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. सोमवारी, १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करण्याचा आदेशही देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is this the beginning of eknath shindes political end nationalist congress party msr
First published on: 09-10-2022 at 13:33 IST