Islampur Assembly Constituency: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांचे वर्चस्व; महायुतीत इस्लामपूरची जागा कोणाला मिळणार?

आधी वाळवा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात मागील तीन दशकांपासून जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे.

Islampur Assembly Constituency
Islampur Assembly Constituency: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांचे वर्चस्व; महायुतीत इस्लामपूरची जागा कोणाला मिळणार? (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. २००८ मध्ये विधानसभा मतदारसंघांची फेरमांडणी झाल्यानंतर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्याआधी हा मतदारसंघ वाळवा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत राजाराम पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. आधी वाळवा विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात मागील तीन दशकांपासून जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. २००९, २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे ५४५०८, ७५१८६ आणि ७२१६९ इतक्या मताधिक्याने जयंत पाटील विधानसभेवर निवडून गेले आहेत. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा इस्लामपूरचा गड काबीज करण्यासाठी भाजपने मोर्चेबंधणी सुरू केली आहे. मात्र गेली तीन दशके या मतदारसंघावर वर्चस्व राखणाऱ्या पाटील यांना नमवण्यासाठी पाटील विरोधकांची मोट बांधण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर आहे. वाळव्यासह शिराळा मतदारसंघात जयंत पाटील यांचे राजकीय वर्चस्व कायम राहिले आहे. या ताकदीवरच त्यांनी सांगली जिल्ह्याचे नेतृत्व मिळविण्याचा कायम प्रयत्न केला. सांगली महापालिकेतही सत्ताबदल घडवून आपली राजकीय ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. घरच्या मैदानात आपल्या विश्वासू शिलेदारांवर जबाबदारी सोपवून ते राज्य पातळीवर पक्षाची प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेतून बांधणी करत आहेत.

हेही वाचा : Election Commission : “हरियाणा निकालांवरुन तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी..” निवडणूक आयोगाचं मल्लिकार्जुन खरगेंना उत्तर

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत इस्लामपूरची जागा युतीतील शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने शिवसेनेने गौरव नायकवडी यांना उमेदवारी दिली तर निशिकांत भोसले-पाटील हे अपक्ष मैदानात उतरले. निशिकांत भोसले पाटील यांना या निवडणुकीत ४३ हजार ३९४, तर शिवसेनेच्यावतीने मैदानात उतरलेल्या नायकवडींना ३५ हजार ६६८ मते मिळाली होती. यावेळी जयंत पाटील १ लाख १५ हजार ५६३ मते घेऊन विजयी झाले. आमदार पाटील आणि विरोधी मतातील फरक ३२ हजार ३०७ मतांचा राहिला. त्यामुळे विरोधकांचे ऐक्य नसल्यास जयंत पाटील यांच्यासाठी आगामी विधानसभा निवडणूकही सोपी ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : हरियाणातील पराभवानंतर असदुद्दीन ओवेसींची काँग्रेसवर टीका; म्हणाले, “स्वतःच्या नाकर्तेपणामुळे…”

पुढचा आमदार भाजपाचाच – बावनकुळे

आगामी निवडणुकीसाठी आमदार म्हणून माजी नगराध्यक्ष निशीकांत पाटील यांनाच लोकांची पसंती असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर सभेत बोलताना सांगितले. त्यामुळे महायुतीकडून सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निशीकांत भोसले पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Islampur assembly constituency ncp sharad pawar leader jayant patil mla from three decades css

First published on: 09-10-2024 at 21:30 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या