शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदन आहे. यानिमित्त अनेक नेते मंडळींसह राजकीय पक्षांकडून त्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. भाजपा नेत्यांनी देखील ट्विट करून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे. तर, भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मात्र बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करताना शिवेसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन. याच स्मृतीदिनी महाराष्ट्रात अमरावतीत दंगलखोर मोकाट अन् हिंदूवर कारवाई. आमचे हिंदुत्व शेंडीजानव्याचे नाही असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व हे अमरावतीत सिध्द झाले. ज्वलंत हिंदुत्व असणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी प्रत्येक कडवट शिवसैनिकांस याची निश्चितच प्रचिती येत असणार. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी आदरांजली.” असं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलं आहे.

अमरावतीमध्ये घडलं काय?

भाजपाने १३ नोव्हेंबर रोजी अमरावती बंदची हाक दिली होती. मात्र या बंदला नंतर हिंसक वळण लागलं. त्रिपुरा राज्यात झालेल्या अत्याचाराविरोधात अमरावतीत १२ नोव्हेंबर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर १५ ते २० हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागले. यात अमरावती शहरातील २० ते २२ दुकानात तोडफोड झाली. काही दुकानादारांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता तर कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न देखील निर्माण झाला. या मोर्चा विरोधात भाजपाने दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ नोव्हेंबर रोजी अमरावती शहर बंदचे आवाहन केलं. मात्र, या बंद दरम्यान आंदोलकांनी हिंसा केल्याचं पहायला मिळालं. आता याच प्रकरणामध्ये पोलिसांनी भाजपाच्या १४ नेत्यांना ताब्यात घेतलं होतं.