विधीमंडळाच्या पावासाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी व विरोधक समोरा-समोर आले, एवढच नाही तर अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाल्याचे समोर आले आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. सत्ताधाऱ्यांनी भाजपावर आरोप केला आहे की, त्यांनी पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना घेरून धक्काबुक्की केली. तर,भाजपाने हा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यामंत्री नवाब मलिक यांनी देखील या प्रकरणावरून भाजपावर जोरदार टीका केली आहे.

Mumbai ravi raja
मुंबई : भांडवली खर्चावरून पालिकेवर आरोप, कंत्राटदारांसाठी तिजोरी खुली केल्याचा रवी राजा यांचा आरोप
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Supriya Sule
Supriya Sule : वाल्मिक कराडप्रश्नी सुप्रिया सुळे आक्रमक; ईडी आणि पीएमएलएचा उल्लेख करत थेट केंद्र सरकारला केलं लक्ष्य!
Walmik Karad Arrest
Vijay Wadettiwar : “वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल करा, कारण संतोष देशमुख यांच्या हत्येचे धागेदोरे..”; काँग्रेसची मागणी
Kurla bus accident , police claim in court ,
कुर्ला बस दुर्घटना चालकामुळेच, संजय मोरेच्या जामिनाला विरोध करताना पोलिसांचा न्यायालयात दावा
Chinmoy Das bail rejected
हिंदू नेते चिन्मय दास यांना जामीन देण्यास नकार, बांगलादेशातील चितगाव न्यायालयाचा निर्णय
cbi itself files case against own officer in corruption charges
भ्रष्टाचाराप्रकरणी सीबीआय अधिकाऱ्याविरोधात गुन्हा;सीबीआयने स्वतः दाखल केला गुन्हा, २० ठिकाणी छापे, ५५ लाख रोख जप्त
Manipur CM N. Biren Singh
Manipur Violence: मणिपूरच्या अशांततेचं पाप काँग्रेसचंच; पंतप्रधान मोदींवरील टीकेला उत्तर देताना बिरेन सिंह यांचा पलटवार

माध्यमांना प्रतिक्रिया देताना नवाब मलिक म्हणाले की, अध्यक्षांच्या दालनात अध्यक्ष उपस्थित होते. तिकडे पीठासीन अधिकारी भास्कर जाधव जे काम करत होते, त्यांना जाऊन सगळ्यांनी घेरलं. त्यांच्याशी धक्काबुक्की केली आणि १५-१५ मिनिटं शिवीगाळ करत असताना, धक्काबुक्की करत असताना अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडलेली नाही. दुःखद हे आहे की हे घडत असताना याचा पुढाकार या राज्याचे विरोधी पक्षनेते करत होते. त्यांच्या नेतृत्वात अध्यक्षांच्या दालनात ही सर्व घटना घडली.

तसेच, आता भाजपावाल्यांना गुंडगिरी करून विधानसभेचं कामकाज चालवायचं असेल, तर हे कधीही चालणार नाही. या पद्धतीचा गुंडगिरीचा कारभार भाजपाकडून करण्यात आलेला आहे. निश्चित रुपाने संसदीय कार्यमंत्र्याच्या माध्यमातून जे जे लोकं जिथे जिथे ज्या प्रकारे त्यांची वागणूक होती. आमचा आग्रह राहील की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आम्ही स्पष्टपणे सांगतोय गुंडगिरी करून सत्ता काबीज करता येत नाही. जनतेने तीन पक्षांचं सरकार दिल्यानंतर बहुमत आहे.., बहुमाताच्या आधारावर सरकार चालत आहे. कधी धमक्या द्यायच्या, कधी सांगायचं की आम्ही तुरूंगात टाकू, त्याच्यातूनही काही होत नसताना आता सरळ धमक्या, गुंडगिरी, मारामारी करण्याचं काम भाजपाची लोक करत आहेत. हे लोकशाहीच्या मार्गाला घातक आहे. महाविकासाघाडी सरकारचे तिन्ही पक्ष हे सहन करणार नाही. विधानसभेच्या नियमानुसार त्यांच्यावर जी कारवाई अपेक्षित असेल, आम्ही निश्चितपणे त्या कारवाईची मागणी अध्यक्षांकडे करणार आहोत. असंही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं.

Story img Loader