छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. वादळात पुतळा कोसळला असता तर समजून घेता आले असते, पण वाऱ्यामुळे पुतळा कोसळला, म्हणजे काम चांगले झाले नव्हते, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मालवण राजकोट किल्ल्यावर भेट देऊन पाहणी केली तेव्हा ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Devendra Fadnavis: “छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलं ही काँग्रेसनी शिकवलं, आता…”, मविआच्या मोर्चावर देवेंद्र फडणवीस यांची टीका

हेही वाचा – Eknath Shinde : “महाविकास आघाडीला निवडणुकीत जनता जोडे मारणार, त्यामुळेच…”, एकनाथ शिंदेंची टीका

आठवले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. राजकोट किल्ल्यावर घडलेली शिवपुतळ्याची दुर्घटना दु:खदायक आहे, मनाला वेदना देणारी आहे. यावरून राजकारण करण्याची आवश्यकता नाही. वादळात पुतळा पडला असता तर समजून घेता आले असते, मात्र वाऱ्याने पुतळा पडला यावरूनच पुतळ्याचे काम चांगले करण्यात आले नव्हते, हे स्पष्ट होते. देशात मोठमोठे शिल्पकार असताना नवख्या शिल्पकाराला पुतळ्याचे काम देणे ही मोठी चूक होती. त्यामुळे या प्रकरणाचा योग्य तो तपास झाला पाहिजे. यातील दोषीवर कठोर कारवाई व्हावी, तसेच मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल उपस्थित होते.