महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मनसे मेळाव्यामध्ये प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेतली. मशिदीवरील भोंगे काढण्याची मागणी करतानाच वेगवेगळ्या मशीदींमध्ये छापेमारी करण्यासंदर्भातील मागणीही राज यांनी केली. राज ठाकरेंनी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरही टीका केली. त्यामुळेच राज यांनी घेतलेली भूमिका मुस्लीमविरोधी असून त्यांना दंगली घडवायच्या आहेत असे आरोप केले जात आहे. याच आरोपांना मनसेच्या नेत्यांनी उत्तर दिलंय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: सुप्रिया सुळेंनी करुन दिली २१०० कोटींच्या प्रकरणाची आठवण तर अजित पवार म्हणाले, “राज ठाकरे पलटी मारणारा…”

त्यांनाही दंगलच हवीय…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पत्रकारांनी दंगल घडावी म्हणून राज ठाकरे अशी वक्तव्य करत असल्याचे आरोप काही राजकीय नेत्यांनी केलेत, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अविनाश जाधव यांनी, “यांना पण तेच हवंय की दंगल घडावी म्हणजे आम्ही आमच्या मतदारसंघांमध्ये सुरक्षित राहू, असं आहे का?” असा प्रश्न उपस्थित केलाय.

नक्की पाहा >> Video: भाषण सुरु असतानाच अजान सुरु झाली अन् गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी…; शिरुरमधील सभेतील व्हिडीओ चर्चेत

भोंगे काढा यावरुन राजकारण होत असेल तर…
“भोंगे काढा असं बोलल्यानंतर दंगल व्हावी अशी काय परिस्थिती आलीय? ही दंगल वगैरे सगळ्या राष्ट्रवादीला हव्या असलेल्या गोष्टी आहेत. या मनसेला हव्या असलेल्या गोष्टी नाहीत. आमची विचारसणी वेगळी आहे,” असं जाधव म्हणाले आहेत. “आम्ही दोनच गोष्टी मानतो पुरुष आणि महिला. कधीच राज ठाकरेंनी धर्माबद्दल हे केलं नव्हतं. पण भोंगे उतरवावे यावरुन एवढं राजकारण होत असेल तर नक्कीच मला असं वाटतं की शर्मेची गोष्ट आहे,” असंही जाधव म्हणालेत.

आव्हाडांवर साधला निशाणा
राज यांच्या वक्तव्यावरुन सतत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देणाऱ्या आव्हाड यांच्यावरही जाधव यांनी निशाणा साधलाय. “मला वाटतं की जितेंद्र आव्हाडांना भोंगा, मशीद, मुसलमान अशा गोष्टी ऐकायला आल्या की त्यांच्या अंगात देव संचारतो. ते भडभड बोलायला सुरुवात करतात. आव्हाड यांनी परवा रात्रीपासून सकाळपर्यंत तीन वेळा प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. गरज काय आहे?”, असा प्रश्न अविनाश जाधव यांनी विचारलाय.

नक्की वाचा >> “पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही…”; नारायण राणेंनी केली राज ठाकरेंची पाठराखण

एकदा प्रतिक्रिया दिली की…
तसेच पुढे बोलताना, “मला असं वाटतंय की जितेंद्र आव्हाडांना एक गोष्ट नक्की माहितीय की राज ठाकरेंच्या बाबतीत बोललो की त्यांना प्रसिद्धी मिळते. मुंब्र्यामधील लोक वाह वाह करतात आणि म्हणूनच ते पुढे येतात. तीन तीन वेळा बोलायची काय गरज आहे. आहो एकदा प्रतिक्रिया दिली की ती चालणार आहे टीव्हीवर,” असा टोला जाधव यांनी लगावलाय.

नक्की वाचा >> विश्लेषण : राज ठाकरेंनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर चर्चेत आलेलं २१०० कोटींचं ‘कोहिनूर स्क्वेअर’ प्रकरण आहे तरी काय?

त्यांचा पुळका येतो मग यांचा का नाही…
“जितेंद्र आव्हाडांना १९९९ नंतरचा इतिहास नीट माहिती नसेल तर त्यांना फक्त ठाण्यातला इतिहास सांगतो, उर्वरित महाराष्ट्राचा जाऊ द्या. ठाण्यात दोन मोठ्या दंगली मी त्यांच्यासमोर आणून देतो २००७-०८ ला राबोडीमध्ये झालेली आणि दुसरी भिवंडीमध्ये झालेली दंगल. यात आपल्या दोन पोलीसांना प्राण गमावावे लागले होते. त्यांची क्रूर हत्या करण्यात आलेली. आज त्यांच्या कुटुंबियांना काय वाटत असेल? याबद्दल आव्हाडांना कधी पुळका आला नाही. आव्हाडांना मशीद, भोंगा याबद्दल बोलल्यावर पुळका येतो,” अशी टीका जाधव यांनी केलीय.

नक्की वाचा >> “लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे…”; पवारांवर राज यांनी केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

मुंब्र्यावरील प्रेम…
“नमाज पठण करु नये, मशिदीत नमाज पठण करायचं नाही असं राज ठाकरे म्हणाले का? जर तुमची श्रद्धा असेल तर ती मंदिराच्या चार भिंतींमध्ये चालते. आज राज ठाकरे पहिल्यांदाच भोंग्यांबद्दल बोलेले नाहीत. आधी पण अनेकदा बोललेत. त्यावेळी तुमच्या लक्षात आलं नाही का? त्यानंतर अनेकदा तुम्हाला राज ठाकरेंची भूमिका बरी वाटली होती,” असं जाधव यांनी म्हटलंय. “हे मुंब्र्यावरील प्रेम आहे. मतदारसंघामधील लोक नाराज होऊ नये म्हणून हे जिंतेंद्र आव्हाडांची तळमळ आहे,” असंही जाधव म्हणालेत.

Story img Loader