वाई : छत्रपती शिवरायांची राजधानी साताऱ्यात शिवजयंती अलोट उत्साहात साजरी झाली. साताऱ्यात आज जिल्हाभर शिवछत्रपतींचा जागर झाला. छत्रपतींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक, जलाभिषेक, १०० फुटी भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण व पुजन, हेलिकॉप्टरमधून शिवस्मारकावर पुष्पवृष्टी करण्यात आली. किल्ले अजिंक्यतारा हजारो मशालींनी उजळला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची तयारी मराठा साम्राज्याची राजधानी सातारा येथे करण्यात आली आहे. भगवे झेंडे कमानी पथकांमुळे संपूर्ण शहर शिवछत्रपतीमय झाले आहे. पवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवतीर्थ परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले होते. आज सोमवारी सकाळी छत्रपती दमयंतीराजे भोसले यांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्दाभिषेक घालण्यात आला.त्यानंतर महाआरती करण्यात आली. यानंतर शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर हेलीकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.
आणखी वाचा-सांगली : मोटार दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात ३ ठार
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाच्या रविवारी रात्री किल्ले अजिंक्यतारावर मशाल महोत्सव आणि लेजर शोचे आयोजन करण्यात आले. यामुळे किल्ले अजिंक्यतारा हजारो मशालींनी उजळून निघाला, तर सातारा शहर लेजर शोच्या प्रकाशात न्हाऊन निघाले. यापूर्वी लोकशाहीर विठ्ठल उमप प्रस्तुत नंदेश उमप निर्मित शिवसोहळा हा ऐतिहासिक कार्यक्रम होणार झाला. या कार्यक्रमात शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत शिवरायांच्या सर्व ऐतिहासिक घटना आणि पराक्रम प्रेक्षकांना विनामूल्य पाहता सादर करण्यात आला. साताऱ्यात प्रथमच घोडे आणि शंभर कलाकारांचा सहभाग असलेला भव्यदिव्य असा शिवसोहळा हा कर्यक्रम होणार झाला.
सायंकाळी गांधी मैदान येथून भव्य शिवमिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे खास आकर्षण म्हणजे केरळ येथील १०० कलाकारांचा सहभाग असलेले प्रसिद्ध केरळ वाध्यपथक या शाही मिरवणुकीत हत्ती, घोडे, उंट यासह ऐतिहासिक देखावे सामील होते. या मिरवणुकीचा समारोप पोवई नाका येथे झाला. यानंतर रात्री शिवतीर्थ येथे छत्रपती शिवरायांची आरती व फाटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.
आणखी वाचा-सांगली : कृष्णा प्रदुषणाबद्दल महापालिकेला ९० कोटीचा दंड
श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा येथे शिवजयंती निमित्त शिवप्रतिमेचे पुजन व शिवकालीन शस्त्रे प्रदर्शनाचे उद्घाटन समारंभ छत्रपती दमयंतीराजे भोसले यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय मुंबई चे डॉ. तेजस गर्गे, इतिहास अभ्यासक, मोडीलीपी तज्ञ वक्ते श्री घनश्याम ढाणे, श्री गणेश शिंदे दुर्गनाद ट्रेक अॅण्ड अॅडव्हेंचर ग्रुप, सातारा, श्री महारुद्र तिकुंडे, सामाजिक कार्यकर्ते, श्री प्रविण दौ. शिंदे सहायक अभिरक्षक, श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा आदी उपस्थित होते.किल्ले प्रतापगड येथून सातारा पुणे कोल्हापूर सांगली सोलापूर येथील शिवजयंती मंडळांनी शिवाजी प्रज्वलित करून धावत घेऊन गेले या शिवाजी जयंती मंडळांच्या उत्साहामुळे पसरणी घाट भगव्या पताकांनी ध्वजांनी उजळून निघाला होता.