राज्य मंत्रीमंडळाने “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताला महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून अधिकृतरित्या हे गीत अंगीकारण्यात येईल.
राज्यगीतासाठी कोणत्या मार्गदर्शक सूचना सरकारने केल्या आहेत त्या जाणून घेऊ. तसंच स्वत:चं राज्यगीत असणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र आता कितव्या क्रमांकावर असेल ते ही पाहू.