काँग्रेस नेते राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या विधानावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या वक्तव्यावरून महाविकासआघाडीत फूट पडू शकते, असं मोठं वक्तव्य केलं. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेने मोठा प्रतिसाद व प्रेम दिलेले आहे. हे काही लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. राहुल गांधी यांनी एका सभेत बिरसा मुंडा ब्रिटांशासमोर झुकले नाहीत, हे सांगताना त्यांची तुलना सावरकरांशी केली. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही,” असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) शेगावमध्ये पत्रकारांशी संवाद करत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा