श्री जलाराम सत्संग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने येथे मंगळवारपासून संत श्री जलाराम बापा जयंती उत्सवास सुरुवात होणार आहे. कन्नमवार पुलाजवळील केवडीबनात असलेल्या श्रीकृष्णधाम येथे उत्सवाचे कार्यक्रम होणार आहेत. सकाळी सातपासून रात्री नऊपर्यंत धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच सकाळी नऊ ते एकदरम्यान मधुमेह तपासणी शिबीर आणि सायंकाळी साडेपाच ते नऊदरम्यान रक्तदान शिबीर होणार आहे. पिंपळगाव बसवंतचे करसनदास ठक्कर आणि नाशिकचे महेशभाई शाह हे या कार्यक्रमांचे आयोजक असून सर्वाना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.