डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना जळगावात घडली आहे. जळगावातील डॉक्टर भरत पाटीलने पत्नी राखीची हत्या करुन तिला हार्ट अॅटॅक आल्याचा बनाव रचला. तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या तयारीत असलेल्या भरत पाटीलला पोलिसांनी अटक केली. या डॉक्टरविरोधात जामनेर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विद्या राजपूत उर्फ राखी पाटील या जळगावच्या न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम करत होत्या. १५ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह जामनेरमधील निसर्गोपचार करणारे डॉक्ट भरत पाटील यांच्याशी झाला. सुरुवातीची काही वर्षे चांगली गेली. मात्र काही वर्षांतच या दोघांमध्ये खटके उडू लागले. वकिलीच्या पेशामुळे विद्या कायमच अनेकांशी फोनवर बोलत असत. या मुद्द्यावरूनच या दोघांमध्ये खटके उडत होते. गेल्या काही दिवसांपासून भरत पाटील हे विद्याला मारहाण करत असत.

१३ जानेवारीला संध्याकाळच्या सुमारास या दोघांमध्ये मोठा वाद झाला. यावेळी भरत पाटीलने विद्या यांना मारहाण करून त्यांचा गळा आवळला. विद्या यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच भरत पाटीलने त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचला. इतकंच नाही तर त्याने तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराचीही तयारी सुरु केली होती. मात्र विद्याच्या माहेरच्या मंडळींनी तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. एवढंच नाही तर पोलिसातही तक्रार नोंदवली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा भरत पाटील विद्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरु केली होती. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या भरतने नंतर मात्र पत्नीच्या खुनाची कबुली दिली. यानंतर भरत पाटीलला अटक करण्यात आली आहे.