घरकुल घोटाळ्यातील एक आरोपी सुरेश जैन यांना धुळे येथील विशेष न्यायालयाने मंजूर केलेला अंतरिम जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एस. िशदे व पी. व्ही. नलावडे यांनी रद्द ठरविला. यापूर्वी १२ वेळा जैन यांचा जामीनअर्ज विविध न्यायालयात फेटाळण्यात आला होता.
मुलाच्या घराची वास्तुशांती व शारीरिक तपासणीसाठी जैन यांनी धुळे येथील विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर १७ दिवसांचा जामीन मान्य करण्यात आला होता. त्याविरोधात सामाजिक कार्यकत्रे नरेंद्र भास्कर पाटील यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात अर्जदार पाटील यांचे वकील प्रवीण चव्हाण यांनी विशेष न्यायालयाने मंजूर केलेल्या जामीन अर्जावर युक्तिवाद केला. मूळ जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित असताना नव्याने धुळे येथील न्यायालयात दाखल केलेला अर्ज बेकायदेशीर आहे. विशेष न्यायालयाचे सरकारी वकील श्यामकांत पाटील यांनी पोलिसांना जामीनअर्जाची कल्पना दिली नाही. तपास अधिकाऱ्यासही माहिती दिली नाही, असे आक्षेप नोंदविले.
शारीरिक तपासणीसाठी विशेष वैद्यकीय सुविधा असताना, तसेच धुळे कारागृहाच्या अधीक्षकांनी कोणतेही प्रमाणपत्र दिलेले नसताना जामीन मंजूर करण्याच्या प्रकियेवर आक्षेप नोंदविले. सुनावणीअंती विशेष न्यायालयाने मंजूर केलेला आदेश रद्द ठरविण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा