जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात वांजोळा गावाजवळ कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेथे मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या ठिकाणी केवळ सांगाडा शिल्लक असल्याने मृतदेहाची ओळख पटविण्याचं आव्हान पोलिसांच्या समोर होतं. मात्र, अशा स्थितीतही जळगाव पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा केला. यामुळे जळगाव पोलिसांचं कौतूक होत आहे.

जळगाव पोलिसांनी मृतदेहाची चप्पल आणि त्याच्या अंगावर असलेल्या कपड्यांच्या आधारे मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान जिल्ह्यात हरविलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास सुरुवात केली. यात भुसावळ शहरात रामदेव बाबा नगर भागात राहणारा रोहित कोप्रेकर हा तरुण आठ दिवसांपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबाने पोलिसात दिल्याचं समोर आलं.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर

या तक्रारीचा आधार घेत रोहितचे कपडे आणि चप्पलच्या माध्यमातून मृतदेह रोहित कोप्रेकार याचाच असल्याचं तपासात निष्पन्न झालं. रोहितचां मृतदेह ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणी रक्ताने माखलेले दगड आणि कपडेही आढळून आले. त्यामुळे रोहितचा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला. मृतदेह पूर्णपणे कुजला असल्याने पोस्टमार्टममध्ये कारण स्पष्ट होणे कठीण होते. पीडित रोहितचा खून झाला असला तरी तो कोणी आणि का केला याबाबत कोणताही ठोस पुरावा समोर नसल्याने पोलिसांना त्याचा तपास करणे मोठे आव्हान होते.

ज्या भागात रोहितचा मृतदेह आढळून आला त्या भागात असलेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी केली. त्यात रोहित बेपत्ता झाला त्या दिवशी त्याच्यासह अन्य दोन तरुण एका हॉटेलात दारू पीत असल्याचं फुटेजमध्ये आढळलं. हाच धागा पकडून पोलिसांनी या दोन्ही तरुणांची कसून चौकशी केली आणि पोलिसी खाक्या दाखविला. यानंतर रोहितच्या दोन मित्रांनी दोरीने गळफास देऊन त्याची हत्या केल्याचं कबूल केलं.

हेही वाचा : औरंगाबादमध्ये पोत्यात आढळलेल्या मृतदेहाचं गूढ उकललं, पत्नीसह मेव्हण्याच्या कुटुंबाला अटक

अद्याप या घटनेमागील कारणांचा पोलीस तपास करीत असले तरी प्रेमाच्या त्रिकोनातून हा प्रकार घडला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात रोहितच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे.

कुजलेल्या मृतदेहाशिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना २४ तासाच्या आत आरोपींना अटक करण्यात यश मिळाल्याने शोध घेणाऱ्या पोलिसांना पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी बक्षीस जाहीर केले आहे.