Jalgaon Pushpak Train Accident Latest Updates : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ मोठा रेल्वे अपघात घडला आहे. बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पुष्पक एक्सप्रेस गाडीने अचानक ब्रेक मारल्याने चाकांमधून ठिणग्या उडाल्या. त्यानंतर आग लागल्याची अफवा पसरली आणि रेल्वेतील प्रवाशांनी उड्या मारल्या. मात्र विरूद्ध बाजूने येणाऱ्या रेल्वे लाईनवरून येणार्‍या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवले. जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे असं म्हटलं आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली?

जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे परधाडे रेल्वे स्थानकानजिक रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून या अपघाताची माहिती घेतली. यावेळी जखमी प्रवाशांना तातडीची मदत व मोफत वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. मंत्री गिरीश महाजन स्वत: घटनास्थळी पोहोचले असून जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांसह जिल्हा यंत्रणा युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य राबवत आहे. जिल्हा प्रशासन आणि रेल्वे यंत्रणा समन्वयानं बचाव व मदतकार्य करीत आहेत. मदतकार्य रात्रीही सुरु राहणार आहे. त्यासाठी ग्लासकटर, फ्लडलाईट्सह आवश्यक यंत्रणा अपघातस्थळी पोहोचली आहे.” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया काय?

“जळगावात झालेली अपघाताची घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन पुढील निर्देश दिले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांवर उपचार सुरु आहेत. सरकारतर्फे आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोत. तसंच या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो.” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

जळगाव रेल्वे अपघात, अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू (फोटो-ANI)

प्रत्यक्षदर्शींनी अपघाताबाबत काय सांगितलं?

जळगावहून पुष्पक एक्सप्रेस निघाली होती, परांडा या स्थानकाजवळ ट्रेन आली असता ब्रेक दाबल्यानंतर घर्षण झालं आणि काही ठिणग्या उडाल्या. या पाहून एका प्रवाशाने आग लागली, आग लागली असं सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे रेल्वेतील ३५ ते ४० प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसने काही प्रवाशांना चिरडलं. या अपघातात ७ ते ८ प्रवासी ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. एकाच डब्यातील लोकांनी या उड्या मारल्याचंही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.