धाराशिव: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऐकून छगन भुजबळ मराठा आरक्षणाला विरोध करत सुटले आहेत. त्यामुळेच ओबीसी नेते एकत्रित येवून मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. शासनाकडे असलेल्या मराठ्याच्या कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी भुजबळांनी लावून धरली आहे. मराठ्यांविषयी कमालीचा आकस त्यांच्या मनात आहे. भुजबळांच्या मागणीप्रमाणे मराठ्यांच्या कुणबी नोंदी सरकारने रद्द केल्यास मराठ्यांची ताकद दाखवून देवू, राज्यातील ५५ टक्के समाजावर संयम सोडायची वेळ आणू नका. अन्यथा सरकारचे अवघड होईल, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला.धाराशिव शहरात बुधवारी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा जागृती शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीस जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव, महिला उपस्थित होत्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचे रूपांतर सभेत झाले.
…अन्यथा सरकारचे अवघड होईल! धाराशिवमधून जरांगे-पाटलांचा राज्य सरकारला इशारा
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऐकून छगन भुजबळ मराठा आरक्षणाला विरोध करत सुटले आहेत. त्यामुळेच ओबीसी नेते एकत्रित येवून मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-07-2024 at 20:14 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jarange patals from dharashiv warn the state government if kunbi records are canceled by the government amy