जालना : दोन दिवसांत कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेऊन मराठा समाजाचा सरसकट समावेश ओबीसीमध्ये करावा, अन्यथा बुधवार, दि. २५ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी दिला. येथील आंतरावली सराटी गावामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्री, खासदार, आमदार यांना राज्यभर गावबंदी करण्यात येईल, असेही जरांगे म्हणाले. बुधवारी उपोषणास बसताना आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जरांगे म्हणाले, की २५ ऑक्टोबरपासून प्रत्येक जिल्ह्यातील ‘सर्कल’ च्या ठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात येईल. २८ ऑक्टोबरपासून या उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात केले जाईल. त्याचप्रमाणे प्रत्येक गावात ‘मेणबत्ती फेरी’ काढण्यात येईल. आंदोलनाचा पहिला टप्पा सरकारला झेपणारा असला तरी दुसरा टप्पा पेलवणारा नसेल. सरकारकडून आमचीच माणसे आमच्या विरोधात उतरविण्यात येत असून त्याबद्दल आपणास बोलावयाचे नाही, कारण मराठा आरक्षण हेच आमचे उद्दिष्ट आहे. आमचे आंदोलन शांततेचे होणार आहे, असे ते म्हणाले. मराठा समाजाच्या नादी लागू नका आणि त्यांच्या भावनांशी खेळू नका. कारण आरक्षण हा त्यांच्या लेकरांचा प्रश्न आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून कुणीही आत्महत्या करू नये. तर माझ्या खांद्याला खांदा लावून लढावे. मरण्यापेक्षा लढून आपण जातीला न्याय देऊ शकतो, असे आवाहन जरांगे यांनी केले.

Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार झाला, पण खातेवाटप कधी होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Proposal to set up independent cancer hospital in Pune gains momentum
शहरबात : पुणेकरांच्या भविष्यासाठी आता तुमची साथ हवी!
Maharashtra State Cabinet Expansion Satara district gets maximum ministerial posts
मराठ्यांना प्राधान्य… सातारा जिल्ह्यास सर्वाधिक मंत्रिपदे… मुंबई, नाशिकची बोळवण… मंत्रिमंडळ विस्ताराला नाराजीची किनार?
no MLA from Solapur district in the new cabinet post of the Mahayuti
महायुतीचे पाच आमदार असूनही सोलापूरला मंत्रिपदाची हुलकावणी
Chief Minister Devendra Fadnavis asserts that there should be a time-bound evaluation of the performance of ministers print politics news
मंत्र्यांच्या कामगिरीचे कालबद्ध मूल्यमापन,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; मंत्र्यांचे खातेवाटप दोन दिवसांमध्ये
maharashtra cabinet expansion many reasons behind chhagan bhujbal ignore for minister post
छगन भुजबळ यांचे मंत्रिपद जाण्यामागे अनेक कारणे
Ministers profile Dadaji Bhuse Gulabrao Patil Girish Mahajan
मंत्र्यांची ओळख : दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन

हेही वाचा >>>मराठा आरक्षणाबाबत जाहिरातीवर विरोधकांची टीका;ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मराठा समाजालाच सर्वाधिक लाभ -सरकारचा दावा

‘मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध’

मी कधीही कुणाला खोटे आश्वासन दिलेले नाही, कोणाची फसवणूक केलेली नाही आणि कधी करणारही नाही. माझ्या राजकीय आयुष्यामध्ये आतापर्यंत मी दिलेला शब्द पाळला आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले. आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नका असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

सरकारने एक महिना मागितला होता. आम्ही दहा दिवस वाढवून दिले, मुदतीचे ४० दिवस झाले असल्याने आता जबाबदारी सरकारची आहे. मराठा समाजास सरसकट आरक्षण देण्याचा निर्णय दोन दिवसांत घ्यावा. – मनोज जरांगे-पाटील

Story img Loader