नगर: मराठे कोणाला घाबरत नाहीत हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे  असे आव्हान देत, मराठा आरक्षण मागणी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी पाथर्डीत बोलताना कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण माघार घेणार नाही, असा इशारा दिला.मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे कूच केलेल्या मराठा आरक्षणातील हजारो समाजबांधवांच्या मोर्चाने आज दुपारी नगर जिल्ह्यात प्रवेश केला.

मोर्चा मार्गावरील गावागावांत जरांगे पाटील यांचे स्वागत केले जात आहे. आगासखांड (ता. पाथर्डी) येथे जरांगे पाटील यांची सभा झाली. या वेळी जरांगे म्हणाले, की राज्यात ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या, तर नगर जिल्ह्यात सव्वादोन लाख कुणबी नोंदी आढळून आल्या. मात्र तरीही सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही.आपल्याला आणखी वेळ द्यावा, असे शासन म्हणत असले, तरीही यापूर्वी सात महिन्यांचा अवधी देऊनही आमची मागणी अजून मान्य केली नाही, असा आरोप त्यांनी केला.

Story img Loader