Who is Jayadeep Apte : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्टला कोसळला. या घटनेवरुन आरोप प्रत्यारोप होत आहेत. नौदल दिनाच्या निमित्ताने हा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र हा पुतळा २६ ऑगस्टला कोसळला आहे.

काय घडली घटना?

मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा ( Shivaji Maharaj Statue ) कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी यावरून राज्य सरकारला धारेवर धरले आहे. या पुतळ्याची ( Shivaji Maharaj Statue ) उभारणी नौदलामार्फत करण्यात आल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले असले तरी, विरोधी पक्षांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर या दुर्घटनेचे खापर फोडले आहे. या घटनेस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली तर, रवींद्र चव्हाण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी खासदार विनायक राऊत यांनी केली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उबाठा, काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांनीही राज्य सरकारवर टीका केली. या घटनेनंतर आता चर्चा होते आहे की पुतळा साकारणारा जयदीप आपटे कोण आहे?

कोण आहे जयदीप आपटे?

जयदीप आपटे ( Jayadeep Apte ) २५ वर्षे वयाचा तरुण शिल्पकार आहे. जो मूळचा कल्याण येथील रहिवासी आहे. जयदीप आपटेकडे २८ फुटांचा ब्राँझचा पुतळा उभारण्याची जबाबदारी नौदलाने सोपवली होती. जयदीप आपटेने ( Jayadeep Apte ) जून ते डिसेंबर अशा सात महिन्यांच्या कालावधीत हा पुतळा पूर्ण केला. जयदीप आपटेने या पुतळ्याबाबत एक भीतीही व्यक्त केली होती.

हे पण वाचा- अग्रलेख: पडलेल्या पुतळ्याचा प्रश्न!

जयदीप आपटेने एका मुलाखतीत काय म्हटलं होतं?

पुतळ्याच्या कामासंदर्भात समजलं तेव्हा मला वाटलं की संधी मोठी आहे. पण त्याचवेळी मनात हा विचार आला होता की सगळं नीट पार पडलं तर आपलं नाव होईल पण एक जरी चूक झाली तर सगळं संपेल. ‘सनातन प्रभात’ला दिलेल्या मुलाखतीत जयदीप आपटेने ( Jayadeep Apte ) हे म्हटलं होतं.

आठ महिन्यांपूर्वी या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. (PC : @YuvrajSambhaji/X)

पुतळ्याचं काम सुरु केल्यानंतर आलेल्या अडचणी

पुतळ्याचं काम सुरु केल्यानंतर मला अडचणी आल्या असंही जयदीप आपटेने सांगितलं होतं. खरंतर पुतळा जोडून जागेवर नेला जातो, पण पुतळा बसवण्याच्या जागेपर्यंतचे मार्ग लहान होते. त्यामुळे हातात असलेला वेळ कमी असल्याने पुतळ्याचे तुकडे २७ ऑक्टोबरपासून जोडण्यास सुरुवात केली. मला छत्रपती शिवरायांनीच उर्जा दिली असंही तेव्हा जयदीप आपटेने ( Jayadeep Apte ) म्हटलं होतं. आता जयदीप आपटेला ( Jayadeep Apte ) नौदलाने जे काम दिलं होतं ते का दिलं? कुणाच्या सांगण्यावरुन दिलं? हे प्रश्न उपस्थित होत आहेत.