इस्लामपुरात दोघांचीही एकमेकांवर स्तुतिसुमने

सांगली :आगामी लोकसभा आणि विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांच्यात हातमिळवणी झाली असून, याची पहिली पायरी म्हणून इस्लामपुरात एकत्र येत दोघांनीही एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सांगली जिल्हय़ातील वाळवा आणि शिराळा हे दोन विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये खा. शेट्टी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सहभागी होण्याचे जवळजवळ निश्चित झाले असून, त्या दृष्टीने मोच्रे बांधणी सुरू करण्यात आली आहे.

या पाश्र्वभूमीवर इस्लामपूर येथील जैन समाजाच्या एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र आले होते. या कार्यक्रमात आ. पाटील यांनी खा. शेट्टी यांचा लोकप्रिय खासदार असा उल्लेख केला. मी आलो त्या वेळेपेक्षा खासदार आल्यानंतर वाद्यांचा गजर मोठा झाला, असे सांगत अगोदर लोकसभा मग विधानसभा असे सांगत राजकीय मांडणीचे संकेत दिले.

तर खा. शेट्टी यांनी आ. पाटील यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला असल्याचे सांगत असताना ऊसदराचा प्रश्नही मांडला. संघटना कारखाने मोडून दर द्या असे म्हणत नसून आमच्या हक्काचा, घामाचा पसा मिळाला पाहिजे, अशी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी अिहसा उद्यान, चारुकीर्ती भवन व चंद्रप्रभू मंदिर येथे बांधण्यात आलेल्या भवनाचे उद्घाटन करण्यात आले, तर युवा मंचने तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. या वेळी अध्यक्ष विजय राजमाने, उपाध्यक्ष शीतल पत्रावळे, काँग्रेसच्या मनीषा रोटे, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील आदींसह कार्यकत्रे उपस्थित होते.

 

 

Story img Loader