राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनर्सची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. मुंबईत जागोजागी जयंत पाटील यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या बॅनरवर जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. याच कारणामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा >>> फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर बोलताना बाळासाहेब थोरातांचे मोठे विधान, शरद पवारांचे नाव घेत म्हणाले, “…तर सरकार पडलेच नसते

Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधानांचा ‘गोपनीय’ गुरुमंत्र आमदारांकडून, ‘जाहीर’सत्तेचा गर्व न ठेवता आचरण करण्याचा मोदींचा सल्ला
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
article about ugc revises vice chancellor selection process
समोरच्या बाकावरून : मांजराच्या पावलांनी ती येते आहे…
This is nation of Hindus their interests come first says Nitesh Rane
हे हिंदूंचे राष्ट्र, त्यांचे हित प्रथम – नितेश राणे
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”

रोहित पवार, निलेश लंकेंच्या विधानामुळे चर्चेला उधाण

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आपल्याला अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यासाठी कामाला लागा, असे विधान कार्यकर्त्यांना उद्देशून केले होते. त्यानंतर ‘मी अजित पवार यांचे काम फार जवळून पाहिलेले आहे. मला त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे असे वाटते,’ असे विधान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वरील विधानांमुळे वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या असताना आता जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करणारे बॅनर्स लागले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

हेही वाचा >>> कथित नाराजीवर बाळासाहेब थोरातांचे थेट भाष्य, म्हणाले “अरे अरे अरे, मी…”

…त्यामुळे तोडी पंचाईत झाली

याच बॅनरबाजीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझा उद्या वाढदिवस आहे. मी पक्षाच्या कार्यालयात आल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी वाढदिवस आजच साजरा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तोडी पंचाईत झाली. कोणीतरी कार्यकर्ते उत्साहाच्या भरात काही गोष्टी करतात. सगळीकडेच लक्ष दिले पाहिजे असे काही नाही. मी कधीही कोणालाही बॅनर लावा म्हणून सांगत नाही. ते बॅनर्स मीही पाहिलेले नाहीत. प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मला समजत आहे,” असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले.

Story img Loader