राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शनिवारी ( १२ ऑगस्ट ) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यात भेट झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे जयंत पाटीलही अजित पवारांच्या गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, “मी अजित पवारांच्या गटात जाणार असल्याच्या चर्चा का होतात? याची मला कल्पना नाही. मी राष्ट्रवादी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असून, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे. अजित पवार आमच्यापक्षात आहेत. पण, अजित पवारांनी पक्षात काही बदल केल्याचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवले आहे. शरद पवारांच्या वतीने आमचं उत्तर पाठवलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगामध्ये भविष्यात न्यायनिवाडा होईल.”

Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”

हेही वाचा : संजय राऊतांच्या “संभ्रम फार काळ राहता कामा नये” विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“मात्र, घरातील वाद घरात संपण्यासाठी कोणताही शहाणा माणूस प्रयत्न करेल. शक्यतो बेरजेचं राजकारण करायचं असते. भागाकार आणि वजाबाकी होऊ नये, हा प्रयत्न कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षाने करायचे असतो. हा प्रयत्न मी एकटाच नाहीतर, शरद पवारांच्या संबंधातील बरेच हिंतचिंतक हा प्रयत्न करत आहेत,” असं जयंत पाटलांनी सांगितलं.

“आम्ही यशवंतराव चव्हाण किंवा शरद पवारांच्या संस्कृतीत राजकारण करणारे लोक आहोत. अचानक पक्षातून माणसे बाहेर जात असतील, तर हे टाळण्याचा प्रयत्न आवश्यक आहे. अन्यथा लढाई सुरु झाली, तर होणारच आहे,” असेही जयंत पाटलांनी म्हटलं.