राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याच्या सर्वांगीन विकासासाठी काय केले पाहिजे, यावर सविस्तर भाष्य केले. महाराष्ट्रात धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. एखाद्या उद्योजकाला विदर्भ, मराठवाडा, खान्देशात संधी देण्याची इच्छा असायला हवी. पुणे, मुंबई, नाशिकच्या पुढे उद्योग कसे जातील याकडे लक्ष देण्यची गरज आहे. मागे राहिलेल्या भागाला पुढे नेण्याचे काम करणे गरजेचे आहे, अशी इच्छा जयंत पाटील यांनी व्यक्त केली. तसेच आरोग्य, शिक्षण क्षेत्रात करावयाच्या कामाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी सांगली जिल्हा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा संदर्भ दिला. ते ‘एबीपी माझा’ने आयोजित केलेल्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या विशेष कार्यक्रमात बोलत होते.
हेही वाचा >> अशोक चव्हाण यांची मुलगी खरंच राजकारणात सक्रिय होणार? खुद्द अशोक चव्हाण यांनीच दिलं उत्तर; म्हणाले, ” माझ्या मुलींना…”
“मी सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. आम्ही सांगली जिल्ह्यात मॉडेल स्कुलची कल्पना चांगल्या प्रकारे राबवली. सांगली जिल्ह्यातील ६०० शाळांपैकी जवळजवळ ४०० शाळा मॉडेल स्कुल म्हणून ओळखल्या जात आहेत. हात धुण्याचे ठिकाण, टॉयलेट, वर्गखोल्या, शिवकण्यासाठीचे साहित्य यावर काम करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे काम आम्ही सांगली जिल्ह्यात केले. सांगली जिल्ह्यात शाळांची शैक्षणिक आणि इतरही क्षेत्रांत प्रगती झालेली आहे,” असे जयंत पाटील यांनी सांगितले.
“प्राथामिक आरोग्य केंद्रांवरही आम्ही काम केले. सांगली जिल्ह्यात एकूण ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या सर्व केंद्रांत सर्व औषधं असावीत, कर्मचारी कायमस्वरुपी असावेत यावर आम्ही काम केलेलं आहे. उद्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येऊन माझ्या जिल्ह्यात भाषण केले आणिआरोग्य, शिक्षण क्षेत्रातील बदल घडवण्याचे आश्वासन दिल्याचा प्रयत्न केला तरी त्या गोष्टी मी अगोदरच केलेल्या आहेत,” असेही जयंत पाटील म्हणाले.