सोलापूर : देशात मोदी सरकारने मागील दहा वर्षात एकीकडे मनमानी कायदे करून जनतेची लूट सुरू चालविली असताना दुसरीकडे ‘ ईडी लावा, पक्ष फोडा आणि भाजप वाढवा ‘ असा एककलमी कार्यक्रमाचा सपाटा लावला आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माढा लोकसभा मतदारसंघात करमाळा तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभांमध्ये जयंत पाटील यांनी भाजपच्या विरोधात टोलेबाजी केली. माढा, साताऱ्यासह बहुसंख्य मतदारसंघांमध्ये जनमत विरोधात चालल्यामुळे भाजपची पायाखालील वाळू सरकू लागली आहे. म्हणूनच दबावाचे आणि धाकदपटशाचे राजकारण भाजपने पुन्हा सुरू केल्याचा आरोप करीत जयंत पाटील म्हणाले, पंढरपुरात आपल्या पक्षाचे नेते अभिजित पाटील यांच्या ताब्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना जप्त करण्याच्या कारवाईमागे भाजपची दमनशाही आहे.

हेही वाचा…धाराशिव : उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पंचवीस एकरावर सभेचे नियोजन – आमदार राणाजगजितसिंह पाटील

म्हणूनच या दबावामुळे विठ्ठल कारखाना वाचविण्यासाठी अभिजित पाटील भाजपमध्ये गेले तरी त्यांना जाऊ द्या, पण अभिजित पाटील हे ‘नेताजी पालकर’ आहेत. ते पुन्हा आमच्या पक्षात परत येतील. दुसऱ्या बाजूला विठ्ठल कारखान्याचे हजारो सभासद शेतकरी त्याचा वचपा काढून भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही पाटील यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil criticize modi government over ed actions on opponents leader psg