मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक होऊ लागले आहेत. राज्य सरकारने मराठा समाजासाठी १० टक्के स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली आहे. परंतु, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. यासाठी ते आंदोलन करत आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर काही आरोप केले आहेत. जरांगे पाटील यांनी प्रामुख्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस मला विष देऊन किंवा इतर मार्गांनी ठार करण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी मनोज जरांगेंविरोधात भूमिका घेतली आहे. दरम्यान, मनोज जरांगेंना कोणाचं पाठबळ आहे, याची चौकशी करा, या मागणीने जोर धरला होता. आज (२७ फेब्रुवारी) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा सभागृहात तीच मागणी केली. शेलार यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या चौकशीची मागणी केली. यावरून सभागृहात प्रचंड खडाजंगी झाली.
“संगीता वानखेडेंचा सत्ताधारी आमदारावर विनयभंगाचा आरोप, SIT चौकशी करा”, जयंत पाटलांची मागणी
भाजपा आमदार आशिष शेलार यांनी सभागृहात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली होती, जी विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-02-2024 at 18:57 IST
TOPICSआशिष शेलारAshish Shelarजयंत पाटीलJayant Patilदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमनोज जरांगे पाटीलManoj Jarange Patilमराठा आरक्षणMaratha Reservation
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil demands sangeeta wankhede molestation allegations ruling mla sit probe asc