केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याचं निश्चित केलं आहे. खरा पक्ष कोणाचा याचा निर्णय ६ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार की अजित पवार यांचा, हे ६ ऑक्टोबरला कळेल. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जयंत पाटील म्हणाले, “निवडणूक आयोगासमोर आमची बाजू मांडू. आम्ही निवडणूक आयोगाला पक्षात फूट पडली नसल्याचं सांगितलं होतं. पण, आयोगानं आमची बाजू न ऐकता फूट असल्याचं जाहीर केलं आहे. याबाबत आम्ही वकीलांचा सल्ला घेत आहे. निवडणूक आयोग अयोग्य वागत आहे, असा त्याचा अर्थ दिसतो.”

हेही वाचा : “यशोमती ठाकूरांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या”, नवनीत राणांच्या वक्तव्यावर बच्चू कडू म्हणाले…

“…म्हणून अजित पवारांना येणं शक्य झालं नसेल”

अजित पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूच्या बैठकीला उपस्थित नव्हते. याबद्दल प्रश्न विचारल्यावर जयंत पाटील यांनी म्हटलं, “अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. कदाचित त्यांना दुसरी काम असतील. त्यामुळे येणं शक्य झालं नसेल.”

हेही वाचा : अजित पवारांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीत शरद पवारांच्यासमोर येणं टाळलं? वळसे-पाटील म्हणाले…

“नाहीतर सर्व सरकारचं कंत्राटी पद्धतीने चालवायला लागू”

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरूनही जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. “सरकारी कर्मचाऱ्यांवर महत्वाच्या जबाबदाऱ्या असतात. तिथे कंत्राटी कर्मचारी नियुक्त करणं चुकीचं आहे. जबाबदारीची पदेही कंत्राटी पद्धतीनं भरली तर अतिशय गंभीर प्रश्न आहे. पैसे वाचवण्यासाठी बेभरवशाच्या लोकांना तात्पुरत्या सेवेत घेऊन काही कामे करून घेतली आणि त्यात चूका आढळल्या, तर त्याचा भुर्दंड जनतेला बसू शकतो. कंत्राटी कर्मचारी नियुक्तील मर्यादा असल्या पाहिजे. अन्यथा सरकारच कंत्राटी पद्धतीनं चालवायला लागेल,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil on ajit pawar and sharad pawar election commission 6 octomber ssa