मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी ( १० जानेवारी ) दिला. शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावली यांची नियुक्ती वैध ठरवली. मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावलेले व्हीप हे राहुल नार्केवर यांनी बेकायदा ठरवले आहेत. यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या व्हीपबद्दल भाष्य केलं आहे.

“आमचा पूर्वीचाच व्हीप आहे. आम्ही व्हीप बदलेला नाही. त्यामुळे शिवसेना आणि आमच्या प्रकरणात फार मोठा फरक आहे. शिवसेनेत व्हीपने दिलेले आदेश बरोबर आहेत का? नेमणूक बरोबर आहे का? असे असंख्य प्रश्न उपस्थित झाले होते. पण, आमच्याकडे हा प्रश्नच उपस्थित होत नाही. त्यामुळे आमची बाजू भक्कम आहे,” असं छगन भुजबळांनी म्हटलं.

maharashtra assembly election 2024 union minister nitin gadkari at a campaign rally of mahayuti candidate in ambad print
जात लोकांच्या नव्हे, तर पुढाऱ्यांच्या मनात! नितीन गडकरी यांचे मत
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
nagpur Congress party leader is campaigning for Congress rebel Rajendra Mulak
रामटेकमध्ये काँग्रेसचा ‘मविआ’विरोधातच प्रचार? शिवसेनेचा आरोप
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
ajit pawar on cm post
अजित पवार म्हणाले, “धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता राहात नाही”; मुख्यमंत्रीपदाबाबतही तडजोडीची तयारी!
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…

हेही वाचा : “भरत गोगावलेंबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मी फिरवला हा गैरसमज…”, राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण

छगन भुजबळांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. “विधानसभा अध्यक्षांसमोर आमची बाजू अद्याप मांडायची आहे. आमची बहुमताची बाजू असून ती अध्यक्षांसमोर मांडू. अध्यक्षांना योग्य निर्णय करावा लागेल,” असं जयंत पाटलांनी म्हटलं.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या ‘इंडिया’ आघाडीतील समावेशबद्दलही जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. “प्रकाश आंबेडकरांना ‘इंडिया’ आघाडीत घेण्यासाठी प्रमुख नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्याला यश मिळेल, अशी आशा आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा : उद्धव ठाकरे गटाचे आमदार आता विधानसभेत कुठे बसणार? राहुल नार्वेकर म्हणाले, “मी त्यांना…”

‘सरकारमधील कर्मचारी ५८ व्या वर्षीच निवृत्त होतात. पण, ८४ वय झालं तरी तुम्ही थांबेना,’ असं बोलत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली होता. अजित पवारांच्या विधानाबद्दल प्रश्न विचारल्यावर जयंत पाटलांनी म्हटलं, “जेवढं शरद पवारांबाबत बोलले जाते, तेवढी मते अधिक भक्कम होतात. त्यामुळे कुणाला शरद पवारांच्या बयाबद्दल बोलायचं आहे, त्यांनी बोलत राहावं. शरद पवारांना महाराष्ट्रातील जनता ओळखतेय. शरद पवारांना हळूहळू पाठिंबा वाढत आहे.”