Jayant Patil on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पडल्याने राज्यसभ संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. विरोधकांनीही हे प्रकरण उचलून धरलं असून सार्वजनिक बांधकाम खात्याने यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. आज महाविकास आघाडीचे नेते आदय ठाकरे यांनी आज राजकोट किल्ल्याला भेट दिली. त्याचवेळी नारायण राणेही तिथे आल्याने गोंधळ निर्माण झाला. तब्बल दोन तास आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर थांबून होते. अखेर ते तेथून निघाले असून त्यानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधला. दरम्यान, जयंत पाटीलही त्यावेळी राजकोट गडावर पोहोचले होते. त्यांनीही संवाद साधला.

“छत्रपती शिवाजी महाराजंविरोधात अनेक लढाया झाल्या. पण त्यांनी की हार पत्कारली नाही. म्हणून महाराष्ट्र नावाचं राज्य निर्माण करण्याचं श्रेय दैवत शिवाजी महाराजांकडे जाते. आज दुर्दैवाने महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारी लोकांनी उभा केला आणि पडला. भ्रष्टाचाराच्या सर्व घटना होत होत या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारतानाही भ्रष्टाचार केला. म्हणूनच ही घटना घडली”, असं जयंत पाटील म्हणाले.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : ‘अनेकांचे पतंग कापले, पण माझा पतंग कुणीही कापलेला नाही’, छगन भुजबळांचं सूचक विधान
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला

हेही वाचा >> Narayan Rane : “एकेकाला घरात घुसून मारेन”, पोलिसांसमोर नारायण राणेंची मविआच्या कार्यकर्त्यांना धमकी

झाड पडलं नाही, पण…

ते पुढे म्हणाले की, “या घटनेच्या चौकशीसाठी सरकराने निवृत्त न्यायाधीश आणि सरकारी हस्तक्षेप नसेल अशी समिती नेमावी. नौदलाला सूचना देऊन काही उपयोग नाही. नौदलाला बदनाम न करता सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेली भ्रष्टाचार उघडकीला आला पाहिजे. या सराकने देशभरात केलेल्या बांधकामातील सुमार दर्जा देशातील जनतेच्या लक्षात आलेला आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची परिस्थिती पाहिली. अशा पद्धतीचे लोक महाराष्ट्रावर राज्य करत आहेत. ४५ किमी वारे वाहिले म्हणून पुतळा पडला, असं राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. त्या दिवशी २८ किमी ताशी वेगाने वारे वाहत होते. एकही झाड या भागातलं पडलं नाही. पण पुतळा पडला. ज्या बाजूने वारा येत होता, त्याच बाजूला पडला. या सर्वांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची आणि सरकारची आहे”, असंही ते म्हणाले.

“स्वतंत्र चौकशी या घटनेची झाली पाहिजे. या भागातले मंत्री म्हणतात की काहीतरी चांगलं घडायचं असेल तर…, महाराष्ट्राच्या दृष्टीने एकच गोष्ट होऊ शकते, महायुतीचं सरकार जनता गाडून देईल आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल”, असंही ते म्हणाले.

Story img Loader