पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील भोपाळ येथील एका भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांनी ७० हजार कोटींच्या जलसिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. या आरोपानंतर अवघ्या काही दिवसांत अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला. यानंतर अजित पवारांविरोधातील भाजपाचा विरोध मावळल्याचं चित्र आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी आरोप करणाऱ्यांवर आहे, असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं. ते शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी ‘टू द पॉईंट’ कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते.

पंतप्रधानांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पुरावे समोर आणणं ही भाजपाची नैतिक जबाबदारी नाही का? असा सवाल विचारला असता जयंत पाटील म्हणाले, “महाराष्ट्रात १५ वर्षे आमचं राज्य होतं. या काळात महाराष्ट्रात जे काम झालं त्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. हे आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी आरोप करणाऱ्यांवर आहे. त्यांचं महाराष्ट्रात राज्य होतं आणि आहे. दिल्लीतही त्यांचंच राज्य आहे. त्यामुळे त्यांनी नैतिकता सांभाळली पाहिजे.”

“त्या १५ वर्षांच्या काळात मी सरकारचा भाग होतो. त्यामुळे त्यावर मी बोलणं उचित होणार नाही. नैतिकदृष्ट्या ते योग्यही होणार नाही. त्यामुळे ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांनी त्यावर बोललं पाहिजे. त्याबाबत खुलासा त्यांनी केला पाहिजे. आपल्याला आठवतंय की, ज्यावेळी २०१९ मध्ये दीड-दोन दिवसांचं (पहाटेचा शपथविधी घेऊन स्थापन झालेलं सरकार) सरकार आलं होतं. त्या सरकारमध्येही क्लीन चिट देण्याचं काम झालं,” अशी आठवण जयंत पाटलांनी करून दिली.

“काही प्रकल्पांमधील भ्रष्टाचारांच्या प्रकरणांत क्लीन चिट देण्यात आली. माझ्यासमोर कधीही अशा भ्रष्टाचाराचा विषय आला नाही. मी त्या खोलात कधी गेलो नाही, पण आरोप वरपर्यंत करण्यात आले असतील तर त्यांना जनतेने हा प्रश्न विचारला पाहिजे,” असंही जयंत पाटील म्हणाले.