अजित पवारांसह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर पहिल्यांदाच मंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो, अशी माहिती भेटीनंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

जयंत पाटील म्हणाले, “सरकारच्या चहापानाबाबत विरोधीपक्षनेते यांच्याबरोबर बैठक सुरु होती. तेव्हा अचानक सुप्रिया सुळे यांचा फोन आला आणि शरद पवारांनी बोलावलं आहे, असं सांगितलं. तेव्हा यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.”

Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Navneet Rana
Navneet Rana : ‘खुर्च्या फेकल्या, माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न…’, अमरावतीमधील प्रचार सभेतील राड्यानंतर नवनीत राणा यांचे गंभीर आरोप
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
Sharad Pawar Eknath shinde Ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”
Sharad Pawar On Ajit Pawar
Sharad Pawar : शरद पवारांकडून अजित पवारांची पुन्हा नक्कल अन् सभेत एकच हशा; म्हणाले, “काही माणसं…”

हेही वाचा : अजित पवारांसह आमदारांच्या भेटीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया काय होती? प्रफुल्ल पटेल म्हणाले…

“सर्वांनी झालेल्या घटनेबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. यातून मार्ग काढण्याची विनंती केली आहे. त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

हेही वाचा : “आमचे दैवत…”; राष्ट्रवादीतील बंडखोर आमदारांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेलांची पहिली प्रतिक्रिया

सहानभुती निर्माण करण्यासाठी ही भेट होती का? या प्रश्नावर जयंत पाटील यांनी सांगितलं की, “अचानकपणे ते येऊन भेटले आहेत. कोणाचा काय उद्देश होता, यावर आज सांगणं अवघड आहे. पण, सर्वांनी दिलगीरी आणि खंत व्यक्त केली आहे. तसेच, सर्वांनी एकत्र यावं, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आमची फारशी चर्चांही झाली नाही.”