Jayant Patil : राज्याची विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. अनेक नेत्यांचे राज्यात दौरे सुरु असून मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षात विधानसभेच्या जागावाटपाबाबत खलबतं सुरु आहेत. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्यावरून उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

या सर्व चर्चांसंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. तसेच शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्री कोण असेल? सुप्रिया सुळे की जयंत पाटील? असा प्रश्न टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर बोलताना जयंत पाटलांनी सूचक उत्तर दिलं. “ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी सर्वजण बसून ठरवतील. शरद पवारांचा निर्णय आम्हाला मान्य असेल”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Sharad pawar on ajit pawar
Sharad Pawar : “नाद करायचा नाय….”, भरसभेत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा; म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की…”
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
ajit pawar on cm post
अजित पवार म्हणाले, “धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता राहात नाही”; मुख्यमंत्रीपदाबाबतही तडजोडीची तयारी!

हेही वाचा : एकनाथ शिंदे महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार? फडणवीसांनी सांगितली NDA ची रणनिती

जयंत पाटील काय म्हणाले?

शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्री कोण? सुप्रिया सुळे की जयंत पाटील? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, “शरद पवार हे खूप अनुभवी नेते आहेत. त्यामुळे आम्ही याबाबत त्यांनी विचारण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तसंच असं कोणीही ठरवून मुख्यमंत्री होत नाही. ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी सर्वजण बसून ठरवतील. शरद पवारांचं नेतृत्व आम्ही मान्य केलं आहे. त्यामुळे शरद पवारांचा निर्णय आम्हाला मान्य असेल. महाविकास आघाडीला यावेळी सत्तेत आणण्याचं आमचं ध्येय आहे. कारण महाराष्ट्राची ती गरज आहे, अशी आमची भावना आहे”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सांगणं कठीण

महाविकास आघाडी आणि महायुतीमधील मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीबाबत टीव्ही ९ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्यावरून चाललेल्या वादावर खोचक टीका केली. ते म्हणाले, “शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण नाही, हे मला सांगता येईल. पण त्यांच्या डोक्यात मुख्यमंत्रि‍पदासाठी कोणाचा चेहरा आहे? हे सांगणे सर्वात कठीण आहे. आता शरद पवारांनी स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आता ठरणार नाही. त्यावर नाना पटोलेंनीही हीच री ओढली. उद्धव ठाकरेंच्या मनात जे होते, ते आता होताना शक्य दिसत नाही. पण मला असे वाटते की, शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? हे जवळजवळ शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.