Jayant Patil MVA Seat Sharing Formula :”महाविकास आघाडीत जागावाटपावर चर्चा होईल तेव्हा थोडे वाद होणं अपेक्षित आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. पाटील यांनी मविआमध्ये वादाची शक्यता देखील वर्तवली आहे. मात्र, “जागावाटपावरून निर्माण झालेले वाद मिटवून आम्ही एकमेकांना समजून घेऊ व पुढे जाऊ”, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. जयंत पाटील यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या आगामी धोरणांवर भाष्य केलं.

जयंत पाटील म्हणाले, “महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटप होईल तेव्हा काही वाद होणे अपेक्षित आहे. त्या वादांची चर्चा देखील होऊ शकते. आमच्यात वादावादी होऊ शकते. अगदीच वाद होणार नाहीत असं होणार नाही. शेवटी आम्हाला एकत्र राहायचं आहे, त्यामुळे आम्ही सगळे एकमेकांना समजून घेऊ आणि मार्ग काढू, असा आम्हाला आमचा विश्वास आहे. कारण कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी एकत्र राहिली पाहिजे. निवडणुकीच्या काळात आम्हाला एकत्रितपणे लढायचं आहे”.

ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

दरम्यान, काही वेळापूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार व मविआचे प्रमुख नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी दावा केला की “आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी महाराष्ट्रात सरकार स्थापन करेल”. राऊत म्हणाले, कालच आमची महाविकास आघाडीची मुंबईत एक बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील जागावाटपासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. महाविकास आघाडीमधील तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अगदी सुरळीत चर्चा पार पडली. या बैठकीत मुंबईतील ९९ टक्के जागांवर आमची सहमती झाली आहे. मुंबई हा मोठा प्रदेश आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळे आम्ही मुंबईबाबतच्या चर्चेला बराच वेळ दिला.

हे ही वाचा >> Narendra Modi : “सर्व पक्ष व राज्य सरकारला सांगतो…”, पंतप्रधान मोदींचं बदलापूर, कोलकाता प्रकरणावर भाष्य

ठाकरे गटाला मुंबईतील २२ जागा?

मुंबईत महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला २० ते २२ जागा मिळू शकतात, असे दावे ठाकरे गटातील काही नेत्यांनी केले आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी राऊत यांच्याकडे विचारणार केली असता ते म्हणाले, “कोण काय सांगतंय? आमचे सहकारी काय सांगतात? याविषयी मी आत्ता काहीच बोलणार नाही. मात्र मुंबईतील ९९ टक्के जागांबाबतचा निर्णय झाला आहे. आता २७ तारखेपासून आम्ही महाराष्ट्रातील जागावाटपावर चर्चा करणार आहोत”.

Story img Loader