संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. महात्मा गांधींचे वडील करमचंद नव्हते, तर एक मुस्लीम जमीनदार त्यांचे वडील होते, असं अजब विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. भिडेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली जात आहेत.

संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडून केली जात आहे. तसेच संभाजी भिडे यांना भाजपाच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचाही आरोप केला जात आहे. या सर्व घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे संभाजी भिडे आणि जयंत पाटील यांचे चांगले संबंध आहे. जयंत पाटील मनोहर भिडेच्या पाया पडायला जातात, असा आरोप सोशल मीडियावर केला जातो. असं असताना जयंत पाटलांनी आता मनोहर भिडेंवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
Assembly Election 2024 Achalpur Constituency Bachu Kadu Mahavikas Aghadi and Mahayuti print politics news
लक्षवेधी लढत: अचलपूर : बच्चू कडूंसमोर चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान

हेही वाचा- भिडे गुरुजींशी तुमचे वैयक्तिक संबंध आहेत का? पत्रकारांनी विचारताच जयंत पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले “मी त्यांना…”

जयंत पाटील ट्वीटमध्ये म्हणाले, “मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. भिडे यांनी यापूर्वीदेखील अनेक अनैतिहासिक आणि अवैज्ञानिक विधाने करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केला आहे. अशाप्रकारे समाजात दुही माजवणाऱ्या विधानांचा मी वेळोवेळी निषेध करत आलो आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे या देशाच्या निर्मितीमधील योगदान अमूल्य आहे. केवळ भारतातच नाही तर जगभर गांधींच्या विचारांना आदर व सन्मान आहे. मनोहर भिडे यांच्यावर सरकारने त्वरित गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी.”

“मनोहर भिडेंशी माझे वैयक्तिक संबंध नाहीत”

“माझे मनोहर भिडे (संभाजी भिडे) यांच्याशी कोणतेही वैयक्तिक संबंध नाहीत. मी त्यांना कधीही भेटायला जात नाही. यापूर्वी त्यांची भेट घेतलेली नाही. ते माझ्या आईच्या मृत्यूनंतर रक्षाविसर्जनाला आले होते. तेवढाच एक प्रसंग आहे. माझ्या आईच्या रक्षाविसर्जनाला हजारो लोक आलेले होते. त्यामुळे सतत अर्थ जळवू नये,” असं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी काही महिन्यांपूर्वी दिलं होतं.

हेही वाचा- “संभाजी भिडेंचा भाजपाशी संबंध…”, शिंदे गटाच्या नेत्याचं थेट विधान

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

अमरावतीच्या बडनेरामध्ये झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या वडिलांविषयी वादग्रस्त विधान केलं. “मोहनदास हे करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले”, असं संभाजी भिडे म्हणाले.