उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लक्ष्य केलं होतं. २०१९ साली ‘प्रदेशाध्यक्ष’ पदावरून जयंत पाटलांनी प्रकाश सोळंके यांना शब्द दिला होता. मात्र, तो जयंत पाटलांनी पाळला नाही, अशी टीका अजित पवारांनी केली होती. याला जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बीड जिल्ह्यातून प्रकाश सोळंकेंनी संधी देत त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याची संधी अजित पवारांकडे होती, असा टोला जयंत पाटलांनी लगावला आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

जयंत पाटील म्हणाले, “२०१९ साली मंत्रीमंडळ विस्तारानंतर सोळंके नाराज झाले होते. ‘बीडमध्ये मी ज्येष्ठ नेता असताना मला मंत्री का केलं नाही?’ असा सवाल सोळंकेंनी उपस्थित केला. याबद्दल मी सोळंकेंची समजूत काढत होतो. तेव्हा, अजित पवार आले आणि सोळंकेंना ‘कार्याध्यक्ष’पदाचा शब्द दिला. यात माझा काहीही संबंध नव्हता. त्यानंतर पक्षानंही मला ‘प्रदेशाध्यक्ष’पद सोडून सोळंकेंना करायचं आहे, असं सांगितलं नाही.”

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”

हेही वाचा : “…म्हणून मंत्रीपदाच्या यादीतून अनिल देशमुखांचं नाव वगळलं”, अजित पवारांचा मोठा दावा

“सोळंकेंना मंत्रीमंडळात यायचं होतं”

“प्रकाश सोळकेंचा ‘प्रदेशाध्यक्ष’ किंवा ‘कार्याध्यक्ष’पदावर फार रस नव्हता. त्यांना मंत्रीमंडळात यायचं होतं. पण, बीड जिल्ह्यातून प्रकाश सोळंकेंनी संधी देत त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याची संधी अजित पवारांकडे होती,” असं जयंत पाटलांनी म्हटलं.

अजित पवार काय म्हणाले होते?

रायगडमधील कर्जत येथे अजित पवार गटाचं वैचारिक मंथन शिबिर आयोजित केलं आहे. यावेळी संवाद साधताना अजित पवारांनी सांगितलं, “२०१९ साली सरकार स्थापन झाल्यानंतर प्रकाश सोळंके नाराज झाले. सोळंकेंना मंत्रीमंडळात यायचं होतं. अशोक डक, मी, प्रकाश सोळंके आणि जयंत पाटील, काही वेळेला धनंजय मुंडे अशा आमच्या बैठका व्हायच्या. प्रकाश सोळंकेंनी राजीनामा द्यायची तयारी केली होती. त्यांचं मत होतं की, ‘मी पक्षासाठी काय कमी केलं? मलाही मंत्रीपद मिळालं पाहिजे.’ मात्र, सोळंकेंनी केलेली मागणी रास्त होती. शेवटी मी आणि जयंत पाटलांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी सोळंकेंना आम्ही ‘कार्याध्यक्ष’पदाचा शब्द दिला.”

“प्रदेशाध्यपद अजूनही चाललंच आहे”

“जयंत पाटलांनी म्हटलं, ‘मी एक वर्ष अध्यक्ष राहतो, एक वर्षानंतर तुम्ही कार्याध्यक्षाचं प्रदेशाध्यक्ष व्हा.’ तेव्हा प्रकाश सोळंकेंनी मान्य केलं. वर्षभरानंतर मी जयंत पाटलांना विचारलं, आपण सोळंकेंना शब्द दिलाय. यावर जयंत पाटलांनी सांगितलं, ‘हे खरंय, पण वरिष्ठ म्हणतात, तूच प्रदेशाध्यक्ष राहा.’ मी म्हणालो, वरिष्ठांना सांगा, मला जलसंपदा विभागातून वेळ मिळत नाही. मात्र, पुढं ढकलत, ढकलत अजून चाललंच आहे. हे बरोबर नाही,” अशी नाराजी अजित पवारांनी व्यक्त केली होती.

हेही वाचा : “मला अजित पवार अन् प्रफुल्ल पटेलांनी मंत्रीपदाची ऑफर दिली होती, पण…”, अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण

“कार्यकर्त्यांना नाराज करायचं, मला अजिबात आवडत नाही”

“एकदा तुम्ही शब्द दिला, एखादा महिना पुढे-मागे चालेल. शब्द देताना दहा वेळा विचार करून द्या. कार्यकर्त्यांना नाराज करायचं, मला अजिबात आवडत नाही. पण, छोट्या-छोट्या गोष्टी साठत जातात,” असं अजित पवारांनी सांगितलं.