शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांची गुप्त भेट झाल्याची सध्या चर्चा आहे. या वृत्ताचं दादा भुसे यांनी खंडन केलं असलं तरी यावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे सध्या नाशिक शहरातच आहेत. त्याचबरोबर आमदार आदित्य ठाकरेदेखील सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. याचवेळी दोघांमध्ये गुप्त बैठक झाल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केली. तेव्हापासून यावर राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी (१९ ऑगस्ट) रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची भेट घेतली. गेल्या १७ महिन्यांपासून ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) तुरुंगात असलेले नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला आहे. नवाब मलिक नुकतेच रुग्णालयातून परतले आहेत. त्यामुळे वेगवेगळे नेते त्यांची भेट घेत आहेत. जयंत पाटील यांनी काल रात्री नवाब मलिक यांची भेट घेतली. भेटीनंतर नवाब मलिकांच्या घराबाहेर पडलेल्या जयंत पाटलांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आदित्य ठाकरे आणि दादा भुसे यांच्यातील कथित गुप्त बैठकीविषयी विचारलं. त्यावर जयंत पाटील म्हणाले, मला त्या भेटीबद्दल काहीच माहिती नाही, तुम्हा प्रसारमाध्यमांकडे माहिती असली तरी माझ्याकडे त्याविषयीची माहिती नाही.

Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
Ajit Pawar Jayant Patil x
Jayant Patil : “अरे बाप नाही, तुझा काकाच…”, जयंत पाटलांचं अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”

जयंत पाटील म्हणाले, अशा भेटीबद्दल माझ्याकडे कुठल्याही प्रकारची माहिती नाही, मी ती माहिती घेईन. माहिती मिळाल्यावर बघू. त्यांच्याकडून (ठाकरे गट) जे आमदार गेले आहेत ते त्यांना भेटणं स्वाभाविक आहे. काही प्रश्न असतात. शेवटी सगळीच माणसं पुन्हा आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करतातच. तसा काही प्रयत्न कुणी करत असेल, पण मला त्या भेटीबद्दल माहिती नाही.

हे ही वाचा >> “ब्राह्मण समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत”, भुजबळांच्या वक्तव्यावर वडेट्टीवार म्हणाले, “शब्द फिरवला…”

दरम्यान, या गुप्त बैठकीच्या चर्चांवर दादा भुसे यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, मी सध्या काही कौटुंबिक कामांसाठी नाशिकला आलो आहे. तर हाच प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारल्यावर ते म्हणाले, दादा भुसे खरंच या रिसॉर्टवर (जिथे आदित्य ठाकरे काही काळ थांबले होते) होते का? असा प्रतिप्रिश्न केला.