वंचित बहुजन आघाडीचा ‘इंडिया’ आघाडीतील समावेश अद्याप अधांतरीच आहे. तसेच, वंचित आघाडी आणि शिवसेना ( ठाकरे गट ) यांची युती झाली आहे. पण, महाविकास आघाडीत अद्याप वंचित आघाडीला सामावून घेतलं नाही. यामुळे वंचितला शिवसेनेबरोबर जागा वाटप करण्यात अडचणी येत आहेत. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

“शिवसेनेबरोबर आमची बोलणी झाली खरी, पण लग्नाची तारीख अजून निघाली नाही. आमच्या लग्नाचा मुहूर्त काढणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन भटजी आहेत. ते जोपर्यंत तारीख काढत नाहीत, तोपर्यंत आमचं लग्न होत नाही. त्यामुळे आम्हाला थांबावं लागत आहे,” असं टीकास्र प्रकाश आंबेडकर यांनी सोडलं होतं.

हेही वाचा : “ठाकरे पिता-पुत्र झोपेत…”, ‘त्या’ प्रकरणावरून भाजपा नेत्याची टीका

“आम्हाला कुणाचही वावडं नाही”

यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांचा खोचक टोला लगावला आहे. “दोघांच्या लग्नाला भटजी अडचण करत असेल, तर पळून जाऊन लग्न करणे हाच पर्याय आहे. आम्हाला कुणाचही वावडं नाही. भाजपाच्या विरोधात ‘इंडिया’ आघाडी निर्माण झाली आहे. आघाडीत सहभागी झालेल्या सर्वांचं स्वागत नेत्यांनी केलं आहे. आघाडीत आल्यानंतर धोरणानुसार काम केलं पाहिजे.”

हेही वाचा : “निवडणुका लढणार नाही, पण…”, योगेंद्र यादव यांनी स्पष्ट केली भूमिका

“सर्वांनीच एकत्र आलं पाहिजे, ही आमची भूमिका”

“महाराष्ट्रात सर्वजण एकत्रित आले, तर निश्चित फायदा होईल. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका सकारात्मक असेल, स्वागत करतो. सर्वांनीच एकत्र आलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. कुणाला टाळणं ही आमची आणि काँग्रेसची भूमिका नाही,” असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil taunt prakash ambedkar over shivsena alliance ssa
Show comments