जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपापाठोपाठ काँग्रेसनेही स्वबळाचा निर्णय घेतला असला, तरी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षविरहित जेजीपी म्हणजेच जयंत जनता पार्टी या निवडणुकीच्या िरगणात उतरण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीबाबत काँग्रेसची भूमिका ठरविण्याचे सर्वाधिकार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम व मदन पाटील यांना देण्यात आले आहेत. दरम्यान, अपात्र ठरविण्यात आलेल्या २३ माजी संचालकांबाबत उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली नसल्याने निर्णय लटकला आहे.
जिल्हा बँकेबाबत काँग्रेसची भूमिका ठरविण्यासाठी मंगळवारी काँग्रेस कार्यकर्त्यांची बठक झाली. या बठकीस जिल्हाध्यक्ष कदम, मदन पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नामदेवराव मोहिते, सम्राट महाडीक, बाळासाहेब गुरव आदीसह जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकत्रे उपस्थित होते. बॅकेच्या निवडणुकीत पक्षविरहित पॅनेल तयार करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव िशदे यांनी तयारी दर्शवित असताना हे पॅनेल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील असेल अशी भूमिका घेतली आहे.
पक्षविरहित पॅनेल तयार करण्याचा एकीकडे विचार सुरू असतानाच भाजपाचे आ. विलासराव जगताप यांनी कदम बंधूंवर टीका केल्याने या पक्षविरहित पॅनेलच्या स्थापनेपूर्वीच फुटीचे ग्रहण लागले. भाजपाने खा. संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर निवडणूक लढविण्याचे जाहीर केले असले, तरी ताकदीच्या जोरावर किती जागा मिळतात यावरच स्वबळ ठरविले जाणार आहे.
माजी मंत्री मदन पाटील, दोन्ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह मातब्बर २३ माजी संचालक निवडणुकीस अपात्र ठरल्याने याबाबतचा उच्च न्यायालयात काय निर्णय लागतो यावर पुढील गणिते अवलंबून राहणार आहेत. निवडणुक निर्णय अधिकार्यानी अपात्र ठरविल्यानंतर १७ जणांनी याविरुद्ध सहकार निबंधकांकडे अपील दाखल केले आहे. तर, उमेदवारी अपात्र ठरण्यापूर्वी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील आज होणारी सुनावणी पुढे गेली आहे. यामुळे इच्छुक असणारे मातब्बर अद्याप गॅसवरच आहेत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा