लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : शिक्षणाचा दर्जा व आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी तत्कालिन पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यात राबवलेला जयंत पॅटर्न राज्यभर राबवण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री पदी असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी जिल्हा परिषद शाळांचा व आरोग्य व्यवस्थांचा दर्जा वाढावा यासाठी सांगली जिल्ह्यात ‘माझी शाळा आदर्श शाळा’ व ‘स्मार्ट पीएचसी’ हे उपक्रम सुरू केले. हे उपक्रम अतिशय यशस्वी ठरले.

आणखी वाचा-मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली, सरकारला दिलेली १३ जुलैपर्यंतची मुदत संपायला अवघे सात दिवस

जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक व भौगोलिक दर्जा सुधारण्यासाठी तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शाळेत डिजिटल क्लास रूम, प्रशिक्षित शिक्षक, प्ले ग्राऊंड, चांगल्या दर्जाचे स्वच्छतागृह आधी गोष्टी समाविष्ट केल्या गेल्या. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरक औषधांचा साठा, सुसज्ज यंत्र तसेच रिक्त जागी योग्य कर्मचारी भरती अशा विविध गोष्टी केल्या गेल्या.

या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला गेला. तसेच शाळेसाठी ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांना एकत्रित करुन विशेष निधी उभारला. सद्यस्थितीला ५५० पेक्षा अधिक शाळांची सुधारणा प्रगतीपथावर सुरू आहे तर तसेच ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी स्मार्ट पीएचसी उपक्रमाची सुरुवात झाली आहे.