मारूल हवेली गावचे ग्रामदैवत निनाईदेवी यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे उद्घाटन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले. कुस्तीगिरांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले. प्रथम क्रमांकाची कुस्ती जयकर खुडेने रवींद्र मदने याला चितपट करत जिंकली.
पाटण तालुक्यातील यात्रा हंगामातील शेवटच्या टप्प्यात मारूल हवेली गावचे ग्रामदैवत श्री निनाईदेवीची यात्रा झाली. त्यानिमित्त कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात आले. मैदानात संभाजी कळसे, शंकर मोहिते, रणजित पवार, जयपाल वाघमोडे, चेतन पाटील, शिवाजी पवार या नामांकित मल्लांच्या कुस्त्या झाल्या. मैदानात लहानमोठय़ा एकूण ७५ कुस्त्या झाल्या. विजेत्या मल्लांचा राज्यपाल श्रीनिवास पाटील व यात्रा समितीने सत्कार केला. या वेळी यात्रा कमिटीचे पदाधिकारी सारंग पाटील, संजय नांगरे, दादासाहेब नांगरे, चंद्रकांत पाटील, नितीन शिंदे, डी. पी. जाधव, सुरेश पाटील, संजय पाटील, बाबुराव नांगरे, नितीन पाटील, राजेंद्र पाटील, सुरेश जाधव उपस्थित होते.
मारूल हवेलीचे मैदान जयकर खुडेने मारले
मारूल हवेली गावचे ग्रामदैवत निनाईदेवी यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे उद्घाटन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले
आणखी वाचा
First published on: 04-05-2014 at 03:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaykar khude won in wrestling in marul haveli