सातारा : सातारा रनर्स फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी ‘जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन’ स्पर्धा रविवारी (दि. १) होणार आहे. या स्पर्धेत आठ हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. देशभरातील धावपटूंना एकत्र आणणे हा स्पर्धेचा हेतू आहे.या मॅरेथॉन स्पर्धेने ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये ‘द मोस्ट पीपल इन सिंगल माऊंटन रन’ चा किताब प्राप्त करत आपली छाप निर्माण केली आहे. यंदाचे या स्पर्धेचे तेरावे वर्ष आहे. देशातील सर्वात खडतर अशी ही मॅरेथॉन मानली जाते. पोलीस परेड मैदान ते यवतेश्वर घाट (कास रस्ता) अशी ही स्पर्धा होणार असून, अनेक मान्यवर धावपटू स्पर्धेत भाग घेताना पाहायला मिळतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्पर्धा सकाळी साडेसहा ते सकाळी साडेदहापर्यंत आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना पुरस्कारांसह सन्मानित करण्यात येते. यासाठी एक्स्पो शुक्रवार व शनिवारी आयोजित केला आहे. या ‘एक्स्पो’चे उद्घाटन शनिवार सकाळी वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. आदिती चंद्रशेखर घोरपडे, उपाध्यक्ष उपेंद्र पंडित व सचिव विशाल ढाणे यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jbg satara hill half marathon organized by satara runners foundation amy