Jitendra Awhad alleges Dhananjay Munde over Booth capturing in parli : महायुतीने ईव्हीएममध्ये घोटाळा करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून होत होता. दरम्यान, आता मविआ नेत्यांनी दावा केला आहे की सत्ताधाऱ्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी मतदान केंद्र ताब्यात घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला आहे. बीडमधील वाढती गुन्हेगारी, गुन्हेगारांना दिल्या जाणाऱ्या संरक्षणावरून आव्हाडांसह अनेक विरोधक थेट धनंजय मुंडेंवर आरोप करत असतानाच आता त्यांच्या निवडणूक विजयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आमदार आव्हाड यांनी एक्सवरील एक पोस्ट (व्हिडीओ) रिपोस्ट केली आहे. यामध्ये एक व्यक्ती ईव्हीएम मशीनवर धनंजय मुंडे यांना मतदान करत असल्याचं दिसतंय. मतदान केंद्र ताब्यात घेऊन धनंजय मुंडे यांना मतदान केल्याचा दावा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने केला आहे.

गजाभाऊ नावाच्या एक्स हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. गोट्या गीते नावाचा इसम ईव्हीएम मशीनवरून धनंजय मुंडे यांना मतदान करताना दिसतोय. गजाभाऊने या व्हिडीओसह कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की “गोट्या गीतेचा अजून एक कारनामा, मतदान करतानाचा व्हिडिओ त्याने टाकलेला आहे. तुम्ही स्पष्ट बघू शकता की त्याच्याबरोबर अजून कोणीतरी बाजूला मतदान करत आहे. हे बूथ कॅप्चर नसेल का?”

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”

हे ही वाचा >> “जमत नसेल तर स्पष्ट सांगा”, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून अजित पवारांचा पोलिसांवर संताप; गृहमंत्री फडणवीस म्हणाले…

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

गजाभाऊची ही पोस्ट रिपोस्ट करत आव्हाड यांनी म्हटलं आहे की “परळी मतदारसंघात २०१ बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले. शाई लावायची आणि बाहेर जायचे… मतदान केंद्राच्या आतमध्ये तुमचं बटण दाबण्याचं काम ही गँग करायची. सगळे एकदम ट्रान्सपरंट (पारदर्शक)… हे सगळं पोलिसांसमोरच घडत होतं, असं परळीचे उमेदवार राजाभाऊ देशमुख यांनी सांगितलं. मतदान केंद्राचे काही व्हिडीओ देखील आहेत. परंतु, याला कोण काय करणार, हे कायद्याचं राज्य आहे. पुढे कोणाला कंत्राट द्यायचं असेल तर त्यांनी वाल्मिक कराडशी संपर्क साधावा”.

हे ही वाचा >> NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?

विरोधकांचा धनंजय मुंडेंवर आणखी एक आरोप

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. वाल्मिक हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून बीडमध्ये प्रसिद्ध आहे. वाल्मिकवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याला अटकेऐवजी पोलीस संरक्षण दिलं जात होतं. त्याला धनंजड मुंडे यांचं पाठबळ असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. याप्रकरणी विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशातच मुंडे यांच्यावर आता आणखी एक आरोप झाला आहे.

Story img Loader